Breaking News

भाजपाच्या टिबरेवाल यांच्यावर ५८ हजारांनी मात करत ममता बँनर्जी विजयी भवानीपूर मतदारसंघ पोटनिवडणूक

कोलकाता: प्रतिनिधी

काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालमधून ममता बँनर्जी आणि तृणमुल काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय मंत्रिमंडळापासून अनेक यंत्रणा राबत होत्या. मात्र ममता बँनर्जी या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यातरी तृणमूल काँग्रेसने एकहाती विजय मिळविला. मात्र कायद्याप्रमाणे सहा महिन्यात विधान परिषद किंवा विधानसभेवर बँनर्जी यांना निवडूण येणे गरजेचे असल्याने अखेर भवानीपूर विधानसभेची पोट निवडूक लढवित विजय मिळविला.

ममता बँनर्जी यांच्यासाठी भवानीपूर मतदारसंघातून निवडूण आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या आमदाराने राजीनामा देवून ती जागा रिक्त केली. त्यामुळे भवानीपूर पोटनिवडणुक जाहिर करण्यात आली. त्यात तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्या विरोधात भाजपाकडून प्रियंका टिबरेवाल यांना उमेदवारी देण्यात आली. या पोटनिवडणूकीचा निकाल आज जाहिर होणार होता. त्यानुसार आज मतमोजणी करण्यात आली असता टिबरेवाल यांच्यापेक्षा मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांना

५८ हजारांपेक्षा अधिक मते मिळवित विजयी झाल्या.

भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर, सर्वांच्या नजरा आज सकाळी आठ वाजेपासून सुरू असलेल्या मतमोजणीकडे लागल्या होते. अखेर या ममता बॅनर्जी यांनी यामध्ये बाजी मारली. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मी भवानीपुरच्या जनतेची ऋणी आहे, असं म्हणत ममता बॅनर्जींनी मतदारांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

नंदीग्राममध्ये रचलेल्या षडयंत्राला भवानीपुरने जोरदार प्रत्युत्तर दिले. भवानीपुरमध्ये जवळपास ४६ टक्के लोक बंगाली नाहीत. त्यांनी देखील मला मतदान केले. पश्चिम बंगालची जनता भवनीपुरकडे पाहत आहेत, ज्यांनी मला प्रेरित केले आहे. जेव्हापासून पश्चिम बंगालची निवडणूक सुरू झाली, केंद्र सरकारने आम्हाला सत्तेतून हटवण्यासाठी षडयंत्र रचलं होतं. माझ्या पायाल दुखापत झाली जेणेकरून मी निवडणूक लढू नये. मी जनतेची आभारी आहे की त्यांनी मला मतदान केलं आणि निवडणूक आयोगाने देखील सहा महिन्यांच्या आतमध्ये निवडणूक घेतली.

पश्चिम बंगालचं मुख्यमंत्रीपद स्वतःकडे कायम राखण्यासाठी ममता बॅनर्जींना हा विजय आवश्यक होता. कारण, मे महिन्यात नंदीग्राम मतदार संघात झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला होता. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीने एकहाती सत्ता आणलेली जरी असली, तरी देखील ममता बॅनर्जी या स्वतः निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना सहा महिन्याच्या आत कायदेशीरदृष्ट्या निवडून येणं गरजेचे होते.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *