Breaking News

न दिलेल्यांसाठी दिवाळीनंतर परिक्षाः नापास झालेल्यांसाठी महिनाभरात पुन्हा उच्च व तत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी
विद्यापीठ अनुदान आयोग व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्यात आल्या. मात्र ज्या विद्यार्थ्यांना कंटोन्मेट झोनमध्ये रहात असल्याने, स्वतः बाधित किंवा कुटुंबिय बाधित झाले असल्याने किंवा अन्य कारणामुळे परिक्षा देता न आलेल्यांसाठी दिवाळी नंतर पुन्हा परिक्षा घेण्यात येणार असून दुर्दैवाने या परिक्षेतही विद्यार्थी नापास झालेला असेल तर त्याच्यासाठी पुन्हा महिना भरात परिक्षा घेणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील सर्व विद्यापीठांकडून घेण्यात आलेल्या परिक्षांमध्ये दरवर्षीपेक्षा यंदा १० ते १५ टक्के पास होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. त्याचबरोबर या परिक्षेच्या कालावधीत एकही विद्यार्थी कोरोनाबाधित न होणे हे खरे विद्यापीठ आणि सरकारच्या प्रयत्नांना आलेले यश आल्याचे त्यांनी सांगितले.
या परिक्षांमध्ये मुंबई विद्यापीठाचे २ लाख ४९ हजार ९५८ तर ऑफलाईन २ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. नागपूरात ७७ हजार ९९८ ऑनलाईन विद्यार्थी तर २ ऑफलाईन विद्यार्थी परिक्षेस बसले. जळगांवमध्ये ५० हजार ५६४ विद्यार्थी ऑनलाईन तर ३ हजार ऑफलाईन परिक्षेस बसले. नांदेडला येथे ९४ हजार ७२३ ऑनलाईन तर १ लाख ०७ हजार १२४ इतके ऑफलाईन पध्दतीने परिक्षेस बसले. सोलापूर येथे ६७ हजार ०६३ ऑनलाईन तर २९ विद्यार्थी ऑफलाईन बसले होते. पुणे येथे १ लाख ८५ हजार ऑनलाईन तर ३० हजार ऑफलाईन पध्दतीने परिक्षेस बसली. एसएनटीडीचे १०० टक्के अर्थात ३२ हजार ८५० विद्यार्थी ऑनलॉईन परिक्षेस बसले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे १०० टक्के अर्थात १ लाख ५२ हजार ८०० विद्यार्थी ऑनलाईन परिक्षेस बसले.
अमरावती ७७ हजार ऑनलाईन तर ३३ हजार ऑफलाईन विद्यार्थी परिक्षेस बसले. गोंडवाना विद्यापीठात १७ हजार ७२१ ऑनलाईन तर ७०० ऑफलाईन विद्यार्थी बसले होते. कोल्हापूरात ४८ हजार ३८० विद्यार्थी ऑनलाईन तर २४ हजार ३०३ विद्यार्थी ऑफलाईन पध्दतीने परिक्षेस बसले होते. औरंगाबादेत ३५ टक्के विद्यार्थी ऑनलाईन तर ६५ टक्के विद्यार्थी ऑफलाईन पध्दतीने परिक्षेस बसले होते. राज्यातील पॉलीटेक्निक कॉलेजचे १०० टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परिक्षा दिल्याचे सांगत या विद्यार्थी पासिंगची टक्केवारी सरासरी ९३ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील काही जण आधी परिक्षा घेत नव्हते म्हणून आंदोलन करत होते. तर आता विद्यापाठाच्या कुलगुरूंनी चांगले काम केलेले असताना त्यांचे काम चांगले नसल्याचे सांगत मोर्चे, आंदोलन काही जण करत आहेत. आता परिक्षा घेतली तर प्रवेश प्रक्रियेवरून आंदोलन करत असल्याची उपरोधिक टीका त्यांनी भाजपाचे नाव न घेता केली.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *