Breaking News

विद्यार्थ्यांनो घाबरू नका, परिक्षा पुन्हा घेणार उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर राज्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने तयारी केली. तसेच कोरोनापासून विद्यार्थ्यांचा बचाव व्हावा यादृष्टीकोनातून या परिक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय सर्व विद्यापीठांनी घेतला. मात्र ऑनलाईनमधील तांत्रिक कारणामुळे अनेकांना परिक्षाच देता आली नसल्याने हवालदिल झालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत दिलासा देत परिक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा त्या त्या विद्यापीठांकडून पुन्हा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारने डिजीटल इंडिया निर्माण करण्याची घोषणा केली. परंतु अद्याप पर्यत डिजीटल इंडिया उभारणीचे काम पूर्ण झाले नाही. तसेच अनेक विद्यापीठांनी ऑनलाईन पध्दतीचा वापर सुरु केलेला असला तरी त्या पुरेशा सक्षम नाहीत. त्यामुळे ऑनलाईन परिक्षा घेताना या विद्यापीठाकडून ऑनलाईन क्षमतेची तपासणी केली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन येता आले नाही. त्यामुळे काही जणांचे पेपर बुडाले तर काही जणांना लॉग इनच करता आले नाही. त्यामुळे आता काय होणार असा सवाल या विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी यासंदर्भात विद्यापीठ आणि उच्च शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या. त्यामुळे ज्यांना परिक्षा देता आले नाही त्यांच्यासाठी त्या त्या विद्यापीठांकडून पुन्हा परिक्षा घेता येणार असल्याचे उच्च शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केले.

Check Also

केंद्राकडे बोट दाखविणारे आघाडी सरकार या नाकर्तेपणाचे उत्तर देणार का ? केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा सवाल

जालना: प्रतिनिधी केंद्र सरकारने गेल्या वर्षी लॉकडाऊन च्या कालावधीमध्ये गोरगरीबांना देण्यासाठी पाठवलेली ६ हजार ४४१ मेट्रिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *