Breaking News

सरकारने काय साध्य केले? शेवटी परिक्षेचा निर्णय झालाच ना भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी

पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या मनस्थितीशी खेळ करणाऱ्या राज्य सरकारची आता माफी मागण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली आहे

सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षे परिक्षांबाबत दिलेल्या निर्णयानंतर भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, एका “बबड्याच्या” हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला…त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला…

आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकार…! ऐकतो कोण? मा. सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला आहे.

कुलपती म्हणून मा.राज्यपालांना,कुलगुरूंना विश्वासात घेतले नाही..

शिक्षण तज्ञांची मते घुडकावली…युजीसीला जुमानले नाही…मंत्री मंडळात चर्चा केली नाही… विद्यार्थ्यांना अखेर पर्यंत वेठीस धरले..

अहंकारातून विद्यार्थ्यांचे एवढे महिने नुकसान केले…काय साध्य केले? महाराष्ट्रातील “पाडून दाखवा सरकारने” स्वतःच्या अहंकारातून स्वतःच तोंडावर पडून दाखवले! पण…विद्यार्थी मित्र, मैत्रिणींनो खचून जाऊ नका… परिस्थितीला धैर्याने समोरे जाऊ या..यश तुमच्या वाट्याला नक्की येईल…तुमचे भविष्य उज्वलच आहे असेही आवाहन ही त्यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

Check Also

अजित पवार यांची माहिती,… समाधान होईल अशा जागा मिळणार

२८ मार्चला एकत्रित महायुतीची मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, त्यावेळी जागा कुणाला किती मिळणार हे जाहीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *