बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर अज्ञात मारेकऱ्याने हल्ला केल्यानंतर रात्री २.३० ते ३.३० च्या दरम्यान ज्या रिक्षाने लीलावती रूग्णालयात नेले. त्यावेळी सैफ अली खानची नेमकी स्थिती काय होती याची आखों देखी हालत सैफ अली खानला रूग्णालयात नेणाऱ्या ऑटोरिक्षा चालक भजन सिंग याने कथन केली.
घटनेच्या दिवशी अज्ञात मारेकऱ्याच्या हल्ल्यात अभिनेता सैफ अली खानला सहा जखमा झाल्या. त्यातच सैफ अली खान याच्या पाठीतही त्या चाकूचा तुकडाही अडकला होता. नेमका त्या दिवशी सैफची गाडी पार्किंगमधून बाहेर आणण्यास वेळ लागत असल्याने सैफ अली खानला अखेर रिक्षातून लीलावती रूग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी रस्त्यावर एकही रिक्षा दिसत नसताना गेटवरच्या वॉचमन आणि सैफ सोबतच्या आणखी एका व्यक्तीने रिक्षाला आवाज देत एकाला बोलावले. त्यावेळी रस्त्यावर असलेल्या रिक्षा चालक भजन सिंग यांनी रिक्षा सैफ रहात असलेल्या इमारतीत नेली. त्यावेळी रिक्षा चालक भजन सिंग याने सांगितले की, अभिनेता रक्ताने माखलेला होता आणि पहिल्यांदा त्याला पाहिले तेव्हा तो चालूही शकत नव्हता.
यावेळी भजन सिंग याला विचारले असता म्हणाला की, त्या रात्री सैफ अली खान याच्यासोबत लहान मुलगा आणि आणखी एक तरूण व्यक्ती असे तिघेजण रिक्षात बसले. त्यानंतर पुढील चार ते पाच मिनिटात सैफ अली खान याला घेऊन मी लीलावती रूग्णालयात पोहोचवले. दरम्यान तेव्हा तेथील परिस्थिती अशी नव्हती की मी त्यांच्याकडून भाडेही घेतले नसल्याचे सांगितले.
पुढे बोलताना भजन सिंग म्हणाले की, “त्यांची प्रकृती इतकी गंभीर होती की मी पैसे मागण्याचा विचारही करू शकत नव्हतो, एवढ्या मोठ्या अभिनेत्याला माझ्या ऑटोमध्ये बसवणे माझ्यासाठी पुरेसे समाधान होते असेही यावेळी सांगितले.
भजन सिंग म्हणाले की, जेव्हा ते लीलावती रुग्णालयात पोहोचले तेव्हा प्रवेशद्वारावर एक गार्ड उभा होता. तेव्हाच त्याला कळले की त्याच्या ऑटोमध्ये कोण आहे. त्याने (सैफ) त्याला (गार्डला) लवकर बोलवा, ‘मैं सैफ अली खान हूं (मी सैफ अली खान आहे)’ असे म्हटले. एक स्ट्रेचर आणण्यात आला आणि तो त्यावर चढला, असल्याचेही यावेळी सांगितले.
गुरुवारी पहाटे अडीच वाजता सैफ अली खानच्या वांद्रे येथील निवासस्थानी हा हल्ला झाला. त्याचा मुलगा जेहच्या खोलीत हाणामारीचा आवाज ऐकू येताच त्याने हस्तक्षेप केला आणि हल्लेखोराने त्याच्या मुलाच्या आयावर हल्ला करताना पाहिले. सैफ अली खानला चाकूने सहा जखमा झाल्या, ज्यामध्ये त्याच्या पाठीवर दोन खोल जखमा आणि त्याच्या मानेवर किरकोळ दुखापत झाली.