Breaking News

पा.रंजिता यांच्या ‘धम्मम’ चित्रपटाचा ट्रेलर घालतोय सोशल मिडियावर धुमाकुळ चित्रपटाच्या ट्रेलरवरून दोन्हीबाजूनी प्रतिक्रिया

दक्षिणेतील सुप्रसिध्द दिग्दर्शक पा.रंजिता यांच्या आता पर्यंतच्या चित्रपटाने टॉलीवूडबरोबरच हिंदी भाषिकांमध्ये वेगळीच मोठी क्रेझ निर्माण केली आहे. त्यांचा अलिकडेच आलेला असुरन, काला, जयभिम आदी चित्रपट मुळ हिंदीत भाषेत नसतानाही सुपर डुपर हिट ठरले. त्यामुळे अखेर लोकाग्रहास्तव हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर हे चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित करावे लागले. या सगळ्या पार्श्वभूमीवर पा. रंजिता यांचा आणखी एक चित्रपट धम्मम हा येवू घातला असून या चित्रपटाचा ट्रेलरही नुकताच जारी करण्यात आला. मात्र या चित्रपटाचा तामीळ भाषेतील ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मिडीयावरून अक्षरक्ष: धुमाकुळ घालत आहे.

पा.रंजिता यांनी त्यांच्या आतापर्यतच्या चित्रपटातून वंचित, दलितांचा दबलेला आवाज मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या चित्रपटाचे स्वागतही सर्व भाषिक सिनेरसिकांकडून करण्यात आले.

धम्मम चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच गौतम बुध्दांच्या विचाराधारेवर चित्रपट असल्याचे सूचकपणे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. या ट्रेलममध्ये एक लहान मुलगी गौतम बुध्दांच्या पुतळ्याच्या खांद्यावर उभे राहून पहात असते. त्यावेळी तिचे वडील तिला बुध्दमुर्तीवर उभे राहु नकोस अशी सूचना करतात. मात्र मुलगी म्हणते, बुध्दाने तर स्वत: देव असल्याचे नाकारले होते. मग तुम्ही का गौतम बुध्दांना देव मानता असे प्रत्युत्तर देते. त्यावर तिचे वडील शांत बसतात.

विशेष म्हणजे हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर काही मराठी भाषिकांनी तामिळ भाषेतील या संवादाला थेट मराठीतच भाषांतरीत करत व्हिडिओवर दिले आहेत. त्यामुळे हा चित्रपट कसा असेल याबाबतची उत्सुकता मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. तर दुसऱ्याबाजूला गौतम बुध्दांच्या विचारसरणीला विरोध करणाऱ्यांकडून बुध्द देव नाही तर त्यांच्यावर मीम केलेले चालतील का? असा सवाल सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत.

परंतु एक मात्र नक्की की तथागत गौतम बुध्दांच्या विचारावर आधारीत स्व.सुनिल दत्त आणि वैजयंतीमाला अभिनित आम्रपाली या चित्रपटानंतर धम्मम हा दुसरा चित्रपट राहणार आहे. तसेच या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे समाजमाध्यमांवर पुन्हा एकादा बुध्दीझमची चर्चा सुरु झाली आहे.

Check Also

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या तीन मराठी चित्रपटांची निवड मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *