Breaking News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघांबाबत आक्षेपार्ह विधान : जावेद अख्तर यांची निर्दोष सुटका याचिकाकर्त्याने तक्रार मागे घेतल्याने न्यायालयाचा निर्णय

एका दूरचित्रवाणीला मुलाखत देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात दाखल मानहानीची तक्रार मागे घेण्यात आली. त्यामुळे मुलुंड दंडाधिकाऱ्यानी अख्तर यांची या खटल्यातून निर्दोष सुटका केली. न्यायालयाच्या निर्णयामुळे जावेद अख्तर यांना दिलासा मिळाला आहे.

तथापि, तक्रारदाराने काही दिवसांपूर्वी अख्तरविरुद्धची तक्रार मागे घेण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आणखी एक याचिका दाखल केली होती. दोन्ही पक्षकारांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवल्याची आणि अख्तर यांच्याविरोधात खटला चालवू इच्छित नाही, अशी माहिती न्यायालयाला दिली. त्याची दखल घेऊन न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग), मुलुंड, एस. डी. चक्कर यांनी गीतकार अख्तर यांची निर्दोष मुक्तता केली.

प्रकरण काय ?

तालिबानमधील सत्तांतरानंतर जगभरात त्याचे प्रतिसाद आणि प्रतिक्रिया उमटत असताना अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला यासंदर्भात मत व्यक्त करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) तालिबानशी तुलना केली. संघाची विचारसरणी तालिबानींसारखी आहे, आरएसएस लोकांची दिशाभूल करते, त्यांचे मानसिक खच्चीकरण असल्याचे अख्तर यांनी म्हटले होते. यामुळे संघाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली असल्याचा आरोप करत आरएसएसचे कट्टर समर्थक अँड. संतोष दुबे यांनी मुलुंड येथील दंडाधिकारी न्यायालयात अख्तर का राजकीय हेतूने आरएसएसच्या नावाचा अनावश्यकपणे वापर केला असल्याचेही दुबे यांनी म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *