बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला. तसेच त्याच्या स्पायनल कॉर्डमध्ये हल्लेखोराने हल्ल्याच्यावेळी वापरलेला चाकूचा तुकडा सैफ अली खानच्या काल अडकला होता. मात्र आता तो तुकडा शस्त्रक्रियेच्या माध्यमातून काढण्यात आल्याची माहिती लीलावती रूग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने आणि सैफची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ डांगे यांनी यावेळी दिली.
डॉ डांगे पुढे बोलताना म्हणाले की, काल सैफ अली खान यांना रिक्षातून रूग्णालयात आणण्यात आले. मात्र आज त्यांची परिस्थिती प्रकृती पाहता कमालीचा फरक प्रकृतीत पडत असल्याचे दिसून येत आहे. काल सैफ अली खान यांच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या शरीरात अडकलेला चाकूचा तुकडा काढण्यात आलेला आहे. आज सैफ अली खान यांनी त्यांचा लहान मुलगा तैमुर सोबत चालण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
काल सैफ अली खान यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र आज त्यांना विशेष खोलीत शिफ्ट कऱण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आणखी काही दिवस त्यांना अंडर ऑब्झर्व्हेशन खाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्जबाबत निर्णय घेण्यात येईल. मात्र पुढील दोन-तीन दिवसात सैफ अली खान यांच्या डिस्जार्चबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.
दरम्यान, डॉ डांगे यांनी सांगितले की, जो चाकूचा तुकडा हा आणखी थोडासा खोलवर घुसला असता किंवा अडकला असता तर सैफ अली खान यांना गंभीर दुखापत झाली असती. तसेच त्यानंतर त्यांना दुसऱ्या व्याधीला सामोरे जावे लागले असते. मात्र तो ऑब्जेक्ट बाहेर काढल्याने ते आता सुरक्षित असून ऑउट ऑफ डेंजर आहेत. आता त्यांच्या प्रकृतीत प्रगती होत असल्याचेही यावेळी सांगितले.
सैफ अली खान याच्या पाठीत अडकलेल्या चाकूचा तुकडा डॉक्टरांनी बाहेर काढला.
हाच तो चाकूचा तुकडा