बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीबरोबर सैफ अली खान आणि सदर आरोपीची झटापट झाली. या झटापटीत सैफ अली खान यांच्यावर ६ चाकूचे वार झाले त्यामुळे जखमी झालेल्या सैफ अली खान याला मध्यरात्रीच रूग्णालयात दाखल करावे लागले. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान पोलिसांनी सदर अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला असता तो ठाण्याच्या कासार वडवली येथे लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला रात्रीच्या वेळी सापळा रचून अटक केली.
वांद्रे आणि ठाण्याच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपीच्या नाव-गावाची चौकशी केली असता तो अज्ञात व्यक्ती मुळचा महाराष्ट्राचा नागरिक नसल्याची माहिती पुढे आली. मात्र तो बांग्लादेशचा नागरिक असल्याची माहिती पुढे आली. तसेच या आरोपीचे नाव मोहम्मद शेहजाद असल्याचे सांगण्यात येत असून तो मुळचा बांग्लादेशचा नागरिक असून पाच महिन्यापूर्वी मुंबईत आला आणि दास या आडनावाने तो ठाणे येथे रहात असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली.
पोलिसांनी पहाटे सदर मोहम्मद शेहजाद यास अटक केल्यानंतर दुपारी सुट्टीकालीन न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी सुट्टीकालीन न्यायालयाने मोहम्मद शेहजाद यास पाच दिवसांची पालिस कोठडी सुनावली. दरम्यान मोहम्मद शेहजाद यांनी सैफ अली खान यांच्या घरी केलेल्या घटनेनंतर तो दादर येथे आला तेथून तो मध्य रेल्वेने ठाणे येथे गेले. मात्र त्तपूर्वी तो वरळी-परळ भागातील एका हॉटेलमध्ये नाष्टा केला आणि त्या हॉटेजमध्ये त्याने ऑनलाईन खाण्याचे बिल पे केले. त्यानंतरच पोलिसांना त्याच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याच्या पर्यंत पोहोचणे शक्य झाले.
दरम्यान पोलिसांनी न्यायालयात मोहम्मद शेहजाद याला हजर केल्यानंतर मोहम्मद शेहजाद हा बांग्लादेश नसून तो मागील सात वर्षापासून मुंबईत रहात होता असा दावा केला आहे. तसेच तो बांग्लादेशी असल्याचा कुठलाही पुरावा आतापर्यंत पोलिसांकडून सिद्ध करण्यात आलेले नाही. तसेच सैफ अली खान याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय कट रचला असल्याची किंवा तशा कटाची शक्यता नसल्याचेही यावेळी न्यायालयात सांगितले.