Breaking News

दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या पत्नीचा आरोप आणि पार्टी आयोजक व्यावसायिकाचा खुलासा कौशिक यांच्या पत्नीने १५ कोटी रूपयांसाठी खून केल्याचा आरोप पार्टी आयोजक व्यावसायिक विजय मालू यांनी व्हिडिओ जारी करत केला खुलासा

सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पण सतीश यांच्या निधनापूर्वी नेमकं काय घडलं? याबाबत पोलीस तपास करत आहेत. सतीश यांनी दिल्लीमधील बिजवासन येथील व्यावसायिक विकास मालू यांच्या फार्महाऊसवर होळी पार्टी केली. या पार्टीनंतरच सतीश यांची प्रकृती बिघडली. यादरम्यान विकासच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले. सतीश यांची हत्या विकासने केली असल्याची तक्रार सतीश कौशिक यांच्या पत्नीने पोलिसांमध्ये दाखल केली.

सतीश कौशिक यांच्या पत्नीने गंभीर आरोप केल्यानंतर विकासने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा सगळ्या प्रकरणाबाबत मौन सोडलं आहे. विकासने होळी पार्टी दरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये सतीश कौशिक मनसोक्त डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर विकासने त्याची बाजू मांडली.

विकास मालू म्हणाले, गेल्या ३० वर्षांपासून सतीश व माझी मैत्री आहे. जगाला माझ्या नावाचा चुकीचा वापर करण्यासाठी एक मिनिटाचाही कालावधी लागला नाही. होळी पार्टीच्या काही तासांनंतर जे काही घडलं त्यामधून आम्ही अजूनही बाहेर पडलो नाही. या प्रकरणाबाबत मी आता बोलू इच्छित आहे.

एखादी घटना ही कोणतीही पूर्व कल्पना नसताना घडते. अशावेळी कोणीच काही करू शकत नाही. प्रत्येकाच्या भावनांचा आदर करा अशी मी प्रसारमाध्यमांना विनंती करत आहे. येणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये सतीश यांची आठवण येत राहील. विकास मालूच्या विरोधात कौशिक यांच्या पत्नीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. विकासने काही वर्षांपूर्वी सतीश यांच्याकडून १५ कोटी रुपये घेतले होते. त्याच्याकडे १५ कोटी रुपये परत करण्यासाठी पैसेच नव्हते आणि या वादामधूनच विकासने सतीश यांची हत्या केली असल्याची तक्रार सतीश कौशिक यांच्या पत्नीने केली.

Check Also

स्टार अभिनेत्री आशा पारेख यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून चर्चेत होत्या

देशातील ६० ते ८० च्या दशकात बॉलीवूडमध्ये म्हणजे तेव्हाच्या हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्यांबरोबर नायिका म्हणून मागणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *