Breaking News

फिल्मीनामा

अमेरिकन गायिकेच्या ट्विटने बॉलीवूडबरोबर केंद्र सरकारही हादरले बॉलीवूड अभिनेत्यांचा कॉल फॉर युनिटीचा नारा तर केंद्राचा ट्विटरला इशारा

मुंबई : प्रतिनिधी केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची जगविख्यात गायिका रिहान्ना (Rihanna) हिने ट्विट करत भारतासह आंतरराष्ट्रीयस्तरावरील अनेक कलावंताना प्रश्न केला. तिच्या या ट्विटमुळे बॉलीवूडमधील अनेक नामवंत अभिनेते, अभिनेत्री आणि चित्रपट निर्माते, गायकांनी कॉल फॉर युनिटीचा नारा देत केंद्र सरकारवर विश्वास दाखविला. तर केंद्र सरकारने चक्क ट्विटरला …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा तांडव टिमला सल्ला त्या सर्व उच्च न्यायालयात जा अंतरीम दिलासा नाहीच

मुंबईः प्रतिनिधी देशाच्या राजकारणात मागील पाच वर्षात झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तांडव वेब सिरीजची निर्मित करण्यात आली. त्यामुळे देशभरातील विविध राज्यात या तांडव वेबसिरीजच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. सदर गुन्ह्यांप्रकरणी दिलासा मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात तांडव टिमने धाव घेतली. परंतु न्यायालयाने दिलासा देण्याऐवजी या टिमला त्या त्या उच्च न्यायालयात जावे …

Read More »

यारा ओ यारा आणि चलो बुलावा गाण्याचे गायक नरेंद्र चंचल यांचे निधन वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नवी दिल्लीः प्रतिनिधी एकेकाळी यारा ओ यारा तेरी अदाओने मारा आणि चलो बुलावा आया है या गाण्याने संपूर्ण गीत रसिकांमध्ये स्वतःचे आगळे-वेगळे स्थान मिळविणाऱ्या गायक नरेंद्र चंचल यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८० वर्षाचे होते. मागील दोन-तीन दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांना येथील अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र …

Read More »

तांडवचे निमित्त…मात्र ५ वर्षातील राजकिय घटनांचा इतिहास तत्कालीन परिस्थितीवर भाष्य करणारी वेबसीरीज

२०१४ साली झालेल्या देशातील सत्तांतरानंतर भाजपाचा दबदबा संपूर्ण देशभरात वाढला. तर दुसऱ्याबाजूला केंद्रातील भाजपा सरकारकडून लोकशाहीवादी लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा येण्यास सुरुवात झाली. तसेच संपूर्ण सामाजिक जीवनाला वळण देणाऱ्या गोवंश हत्या, पाकिस्तानच्या अनुशंगाने सुरु झालेल्या राजकारणाच्या माध्यमातून देशात मुस्लिम विरोधी वातावरणाला मिळणारे खतपाणी आदी मुळे देशात पहिल्यांदाच मोदी भक्त विरूध्द …

Read More »

नव्या नाटकांचे नाट्यनिर्मितीचे अनुदान पुढील आठवड्यात मिळणार सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत असणारे प्रयोग अनुदान पुढील आठवड्यात निर्मात्यांच्या खात्यात जमा होईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. यासाठी चाळीस लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यामार्फत नाट्य अनुदान योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत …

Read More »

चित्रपट आणि मनोरंजनास उद्योगाचा दर्जा देणारा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रात चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राचे जाळे विस्तारत असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळण्यास मदत होते. चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देण्यासंदर्भातला प्रस्ताव लवकरच मंत्रीमंडळ बैठकीत मांडण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देण्यासंदर्भातील बैठक मंत्रालयात सांस्कृतिक …

Read More »

एनसीबीला २ महिन्याच्या शोधानंतर सापडली ही कॉमेडियन अभिनेत्री आणि तिचा पती भारती सिंह आणि हर्षला गांजा बाळगल्याप्रकरणी अटक

मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबी अर्थात नार्कोटीक्स विभागाला दोन महिन्याच्या अथक परिश्रमानंतर सुप्रसिध्द टेलिव्हिजन कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष यांच्या घरी गांजा आढळून आला. त्यामुळे या दोघांना नार्कोटीक्स विभागाने अटक केली. शनिवारी सकाळी या पथकाने भारती सिंहच्या घरावर आणि …

Read More »

महाविकास आघाडी सरकार राज्यात परवडणारी सिनेमागृहे उभारणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी सिनेमा व नाटक हा समाजाचा आरसा आहे असे म्हटले जाते. कारण समाजात जे आजूबाजूला घडत असते त्याचे प्रतिबिंब आपल्याला सिनेमातून पहायला मिळते. महाराष्ट्रात वेगवेगळया विषयावर बनत असलेल्या कलाकृती गावपातळीवर, खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट …

Read More »

राज नी शॉन कॉनरी यांना वाहिली अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली; वाचा त्यांच्याच शब्दात बॉन्ड म्हणजे शॉन कॉनरी

मुंबई : प्रतिनिधी प्रसिध्द चित्रपट अभिनेते तथा हॉलीवूडपटाच्या जेम्स बॉण्ड या चित्रपटाचे पहिले आणि सर्वाधिक बॉण्ड म्हणून व्यक्तीरेखा साकारलेले शॉन कॉनरी यांचे नुकतेच त्यांच्या राहत्या घरी वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. महाराष्ट्रात राजकिय नेता ते चित्रपट रसिक म्हणून परिचित असलेले तथा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या खास शब्दात शॉन …

Read More »

चित्रपट, टि.व्ही.सीरीयल यासह मनोरंजन क्षेत्रासाठी लवकरच स्वतंत्र धोरण सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्यात मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात घेता मनोरंजन क्षेत्राबाबतचे धोरण सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निश्चित करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज घोषणा केली. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या (फिल्मसिटी) संचालक मंडळाची बैठक आज मंत्रालयात …

Read More »