बॉलीवूडमधील सर्वात चर्चेत असणारी जोडी म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पादूकोण. या दोघांना सप्टेंबर महिन्यात कन्यारत्न झाले आणि दोघांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. दोघे ही आई-वडील झाल्याची माहिती दोघांच्या इस्टाग्रामरून जाहिरही केली. त्यानंतर आज दिवाळीचा मुहूर्त साधत दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंग जोडीने त्यांच्या कन्येचा नामकरण सोहळा पार पडला. तसेच मुलीचा फोटोही शेअर केला.
दिवाळी सणाचा मुहूर्त साधत दीपिकाने तिच्या मुलीच्या नावाचा खुलासा केला आहे. रणवीर-दीपिकाने त्यांच्या मुलीचं नाव खास ठेवलं असून मुलीच्या नावाचा अर्थही दीपिकाने यावेळी सांगितला. फोटोमध्ये तिच्या मुलीचे गोंडस पाय दिसत आहे. दीपिकाने तिच्या मुलीचे नाव दुआ असे ठेवले असून मुलीचे पूर्ण नाव सांगताना दुआ पादूकोण सिंह असे ठेवले असल्याचे सांगितले.
दीपिकाने मुलीच्या नावाचा अर्थ सांगताना म्हणाली,
दुआः म्हणजे प्रार्थना
कारण ती आमच्या प्रार्थनेचे उत्तर आहे.
आमची मनं प्रेम आणि कृत्यज्ञतेनं भरली आहेत.
दीपिका आणि रणवीर
असे कॅप्शन देत फोटोही शेअर केला.
दीपिका आणि रणवीर सिंग यांच्या इन्स्टावरील सामाईक अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. दरम्यान दीपिका आणि रणवीरच्या चाहत्यांकडून लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडत असून मुलीचं नाव सुदंर ठेवलं असल्याचे कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत. त्यावर अभिनेत्री आलिया भट्टनेही आपली कमेंट्स दिली आहे.
सप्टेंबर महिन्यात दीपिका आणि रणवीर सिंग हे दोघे ही मुंबईतील प्रसिद्ध अशा सिद्धीविनायक मंदीरात गेले होते. गणेश चर्तुर्थीच्या दुसऱ्या दिवशी दीपिका पादूकोण हीला सुंदरश्या मुलीला जन्म दिला. त्यावेळी दोघांनीही आई बाबा झाल्याची माहिती इस्टाद्वारे शेअर करत त्यांच्या चाहत्यांना दिली होती.