Breaking News

मॅच फिक्सिंग – द नेशन ॲट स्टॅक चित्रपट प्रदर्शनास न्यायालयाचा हिरवा झेंडा मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरण- चित्रपटाच्या प्रदर्शनाला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरणावर आधारित मॅच फिक्सिंग – द नेशन ॲट स्टॅक हा चित्रपट काल्पनिक असल्याचे स्पष्ट करून चित्रपटाच्या प्रदर्शनास स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली.

हा चित्रपट काल्पनिक कथांवर आधारित आहे आणि आधीपासूनच बाजारात असलेल्या पुस्तकावर आधारित असल्याचे चित्रपटाच्या निर्मात्याने न्यायालयाला सांगितले. तसेच चित्रपटाच्या सुरूवातीस हा चित्रपट काल्पनिक आहे आणि कोणत्याही मृत किंवा जिवंत व्यक्तीशी संबंध नसल्याचे प्रदर्शित केले जाईल, असेही स्पष्ट केले. त्याची दखल घेऊन न्या. बी.पी कोलाबावाला आणि न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. याचिकाकर्त्याची भीती चुकीची आहे. हा चित्रपट काल्पनिक कथांवर आधारित असल्यामुळे अंतिम युक्तिवादाच्या टप्प्यावर असलेल्या खटल्यावर परिणाम होईल, अशी कोणतीही भीती बाळगता येत नाही, तसेच भारतीय न्यायव्यवस्थेवर अशा चित्रपटांचा प्रभाव पडतो का?, जर पुस्तकावर बंदी घालण्यात नाही, त्यामुळे न्यायाधीशावर पुस्तकाचा प्रभाव पडला नाही? तर चित्रपटावर बंदी का घालायची? असे प्रश्नही उपस्थित करून न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.

चित्रपटामुळे खटला प्रभावित होईल असा दावा करून चित्रपटाला स्थगिती देण्याची मागणी या प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी केली होती. या चित्रपटामुळे आपली प्रतिष्ठा डागाळली जाईल, चित्रपटात भगवा दहशतवाद चित्रपटात दाखवण्यात आला आहे, त्यामुळे किमान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी, अशी मागणी पुरोहितची बाजू मांडणारे अधिवक्ता हरीश पंड्या यांनी केली. परंतु, राज्.यातील निवडणुकीचा चित्रपाटाशी काय संबंध?, प्रश्नच उद्भवत नाही, हे पुस्तक वर्षानुवर्षे प्रकाशित होत आहे, असे अधोरेखित करून न्यायालयाने पुरोहित यांची मागणी फेटाळून लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *