Breaking News

दिग्गज अभिनेते निळू फुलेंचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून उलघडणार स्वतः अभिनेते प्रसाद ओक यांनीच व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

मागील काही वर्षात विविध महापुरूषांबरोबरच चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील उत्तुंग अभिनेत्यांच्या जीवनावरील चरित्र पटांचा ट्रेंड वाढला आहे. आता यात मराठी चित्रपटातील आपल्या खलनायकीच्या अदानी आणि ग्रामीण भागातील बेरक्या राजकारणी व्यक्तीरेखेबरोबरच, विनोदी भूमिका साकार करत आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटविणारे दिग्गज अभिनेते निळूभाऊ फुले यांच्या जीवनावरील चरित्रपट लवकरच येणार आहे. निळू फुलेंवरील चित्रपटाची तयारी सुरु असल्याची घोषणा अभिनेता प्रसाद ओक यांनी केली.

तसेच यातील निळूभाऊंची भूमिकाही तेच साकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठीतले एक दिग्गज अभिनेते निळू फुले यांनी आतापर्यंत २५० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयनाने त्यांनी अनेकांची मन जिंकली आहेत.

प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रसाद ओक लवकरच दिग्गज अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर आधारित बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. तो या चित्रपटात दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच तो ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असताना त्याने माध्यमांशी बोलताना हे जाहीर केले. तसेच या चित्रपटाची तयारी सुरु झाली असल्याचेही त्याने सांगितले. मात्र यात कोणते कलाकार तंत्रज्ञ असणार आहेत याबाबत त्याने माहिती दिली नाही.

काही दिवसांपूर्वी निळू फुले यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रसाद ओकनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली होती. प्रसाद ओकनं त्याच्या पोस्टमध्ये निळू फुले यांची मुलगी गार्गी फुले यांनाही टॅग केलं होतं. आपल्या या पोस्टमधून त्यानं निळू फुले यांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तसेच त्याने पोस्टमधून बायोपिकची माहिती दिली होती.

प्रसाद ओकने आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत आहे. ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातील प्रसाद ओकची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आ

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

३८ व्या वर्षी हा अभिनेता आता चढणार तिसऱ्यांदा बोहल्यावर; बिगबॉस च्या घरात लग्नाच्या बंधनात अडकलेला हा अभिनेता करणार तिसरं लग्न

बिगबॉस हिंदी या शो ने अनेकांचं भाग्य बनवलं तर अनेकांच करियर सेट करू टाकलं अशातच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *