गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार मध्ये महाराष्ट्र फिल्मसिटी मुंबईचा स्टॉल उभारण्यात आला असून हा स्टॉल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. विशेष म्हणजे फिल्म बाजारामध्ये या स्टॉलची चर्चा असून अनेक देश विदेशातील कलाकार,दिग्दर्शक, निर्माते तसेच अधिकारी स्टॉलला भेट देऊन कौतुक करत आहेत.
या स्टॉलमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे फिल्म बाजारात आलेल्या चार चित्रपटांची माहिती, चित्रपटांच्या लोकेशन करिता लागणाऱ्या परवानगी देणारी फिल्म सेल प्रणाली,कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ कलासेतू पोर्टल आदी गोष्टींचे प्रमोशन व्यापक स्वरूपात करण्यात येत आहे.
हा स्टॉल तंत्रस्नेही बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून सर्व प्रकारची माहिती क्यूआर कोडने देखील तयार करण्यात आले आहे.
कलाकारांच्या भेटीने सजला फिल्मसिटीचा स्टॉल!
कालपासूनच विविध कलाकार, चित्रकर्मी स्टॉलला भेट देत असून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर,दिग्दर्शक अनंत महादेवन, दिग्दर्शक निखिल महाजन यांच्या सह विविध कलाकारांनी काल-आज भेट दिली आहे.
शिवाय केंद्रीय सचिव संजय जाजु यांनी देखील स्टॉलला भेट देऊन फिल्मसिटीने सजावट केलेल्या स्टॉलचे कौतुक केले.
व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमात महामंडळाने सहभाग घेतला आहे. छबीला,आत्मपाँपलेट ,तेरव,विषयहार्ड या
चार चित्रपटांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधीसह सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर ,मुख्यप्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे आणि काही अधिकारी कर्मचारी यांचे शिष्टमंडळ उपस्थित आहे.