Breaking News

सर्पदंशामुळे अभिनेता सलमान खान रूग्णालयात दाखल बिनविषारी साप असल्याने पुढील अनर्थ टळला रात्रीच मिळाला डिस्चार्ज

मराठी ई-बातम्या टीम

बॉलीवूड स्टार सलमान खान याला काल रात्री त्यांच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर साप चावल्याची घटना उघडकीस आली असून सदरचा साप बिन विषारी असल्याने पुढील अनर्थ टळला आहे. मात्र साप चावल्यानंतर लागलीच सलमान खान यास रात्री २ ते ३ वाजता  लगेच त्याला कामोठे जवळील एमजीएम रूग्णालयात उपचारासीठ दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना लगेच घरी पाठवून दिले असून सलमान पुन्हा फार्म हाऊसवर विश्रांतीसाठी परतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेबाबत खान कुटुंबियांकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात येत असून त्यावर अद्याप अधिकृत माहिती खान कुटुंबाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी तो पनवेलच्या फार्महाऊसवर गेला असताना ही घटना घडल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानचा उद्या वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी तो पनवेलच्या फार्महाऊसवर गेला होता. याच फार्महाऊसवर सलमानला सर्पदंश झाला.

हा साप विषारी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सलमानला डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो पुन्हा त्या फार्महाऊसवर परतला आहे. सलमानचे हे फॉर्म हाऊस पनवेलमधील ग्रामीण भागात आहे. माथेरानच्या डोंगर रांगामधील नेरे या ठिकाणी त्याचे फॉर्महाऊस असून सलमान हा अनेकदा त्या ठिकाणी जातो. तो त्या ठिकाणी शेती करताना, ट्रॅक्टर चालवतानाचे अनेक फोटो व्हिडीओ व्हायरल त्याने रिलीज केले आहेत. सलमानचा उद्या वाढदिवस आहे. त्यातच ख्रिसमसची सुट्टी हे निमित्त साधून त्या फॉर्महाऊसवर राहण्यासाठी गेला होता. यावेळी रात्री तो जंगलात फिरत असताना त्याच्या पायाला साप चावल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे.

यानंतर रात्री ३ वाजता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र हा साप बिनविषारी असल्याचे सलमानच्या जीवावर बेतलेले नाही. तो सध्या त्याच्या फॉर्महाऊसवर विश्रांती घेत असल्याचे बोललं जात आहे.

Check Also

अभिनेते राजीव कपूर यांचे निधन वयाच्या ५८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबईः प्रतिनिधी प्रसिध्द शो-मॅन स्व.राज कपूर यांचे तृतीय पुत्र तथा दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *