Breaking News

आता सलमान खानला मिळाली जीवे मारण्याची धमकी पोलिसांकडून सलमान खानच्या सुरक्षेत वाढ

बॉलीवूड रॉकस्टार सलमान खान याला काही वर्षापूर्वी कुख्यात गॅगस्टर बिष्णाई याच्याकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा सलमान खान यास जीवे मारण्याची धमकी एका अज्ञात इसमाने दिली असून त्यासंदर्भातील एक चिठ्ठी प्रसिध्द लेखक सलीम यांना ते फिरायला गेले असता मिळाली. ही चिठ्ठी हाती पडताच सलीम खान तात्काळ वांद्रे पोलिस ठाणे गाठत यासंदर्भातील तक्रार नोंदविली.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे सलीम खान सकाळी फिरण्यासाठी गेले होते. तिथे ते एका बाकावर बसले असताना त्यांना हे पत्र आढळून आले. या पत्रात त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिनेता सलमान खानला धमकी देण्यात आली. ‘सलमान खानचा सिद्धू मुसेवाला करून टाकू’ असे या पत्रात लिहण्यात आले होते. हे पत्र वाचल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मनोरंजनसृष्टीत सध्या भीतीचं सावट असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबी रॅपर सिध्दू मूसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच सलमान खान याला ही धमकी देण्यात आल्याने चित्रपट सृष्टीत घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंजाबमधील प्रसिध्द रॅपर सिध्दू मुसेवाला याच्या जीवाला धोका असतानाही पंजाबमध्ये नव्याने सत्ता स्थानी विराजमान झालेल्या आप सरकारने मुसेवाला याची सुरक्षा कमी केली. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मुसेवाला याच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या पत्रानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Check Also

प्रसिध्द कथ्थक नृत्यविशारद पंडित बिरजू महाराज यांचे निधन वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी ई-बातम्या टीम ख्यातनाम कथ्थक नृत्यविशारद आणि नृत्यातील पंडीत म्हणून ओळखले जाणारे पंडित बिरजू महाराज …

Leave a Reply

Your email address will not be published.