१६ जानेवारी रोजी वांद्रे येथील निवासस्थानी झालेल्या चाकू हल्ल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला आज मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापूर्वी पत्नी करिना कपूर खान आणि मुलगी सारा अली खान रुग्णालयात पोहोचल्याचे दिसून आले. घुसखोराने सैफ अली खानच्या घरात घुसल्यानंतर सैफ अली खान आणि घुसखोर यांच्यात झालेल्या झटापटीत एका सैफ अली खान जखमी झाला. तसेच या झटापटीत सैफच्या मणक्याच्या जवळ त्या चाकूचा अर्धाभाग ही तुटलेल्या अवस्थेत शरीरात अडकून राहिला होता. हा चाकूचा तुकडा काढण्यासाठी लीलावती रूग्णालयातील डॉक्टरांना दोन वेळा शस्त्रक्रिया करावी लागली. तसेच सैफच्या जखमेवर प्लास्टीक सर्जरीही करण्यात आली.
सैफ अली खान याला डिस्जार्च देण्यात आल्यानंतर सैफ पांढऱ्या शर्ट घातलेला होता. तसेच त्याने चेहऱ्यावर काळा गॉगल लावला होता. रूग्णालयातून बाहेर पडल्यानंतर तो स्वतः चालत त्यांच्या वाहनात ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसला. रूग्णालयातून डिस्जार्च दिल्यानंतर तो पुरेसा कंन्फर्ट असल्याचे दिसून येत होते.
घरी पोहचल्यानंतर सैफ अली खान गाडीतून उतरून थेट इमारतीच्या आत स्वतः चालत जात १२ व्या मजल्यावरील त्याच्या घरी पोहोचला.
दरम्यान, करिना कपूरला लीलावती रुग्णालयातूनबाहेर पडताना पाहिले गेले. सैफ अली खानवर मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादने हल्ला केल्याचा आरोप आहे, ज्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी वैध ओळखपत्रांशिवाय भारतात राहणारा बांग्लादेशी नागरिक असल्याचे म्हटले आहे. आपली ओळख लपवण्यासाठी शहजादने विजय दास हे नाव धारण केले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. रविवारी त्याला वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले आणि पुढील चौकशीसाठी पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
मुंबई पोलिसांनी शहजादविरुद्धचे सर्वात सबळ पुरावे गोळा केले आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच पोलिसांनी गुन्ह्याच्या ठिकाणी घेतलेले बोटांचे ठसे आरोपींच्या बोटांच्या ठशांशी जुळतात. तपासकर्त्यांना शहजाद घरात प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी वापरत असलेल्या बाथरूमच्या खिडकीवर, डक्ट शाफ्टवर आणि इमारतीत चढण्यासाठी वापरत असलेल्या शिडीवर त्याचे बोटांचे ठसे आढळले.
पोलिसांनी त्यांच्या तपासाचा भाग म्हणून आरोपीला वांद्रे येथील सतगुरु शरण इमारतीच्या ११ व्या मजल्यावर असलेल्या सैफ अली खानच्या निवासस्थानी नेले. त्याला घटनांचा क्रम पुन्हा तयार करण्यास सांगितले गेले, अभिनेत्याशी झालेल्या झटापट आणि त्याने इमारतीत कसा प्रवेश मिळवला आणि पळून कसा गेला याचा तपशील दिला. तसेच पोलिसांनी गुन्ह्याचा सीन रिक्रेट केला गेला.
लीजिए, अस्पताल से हो गई सैफ अली खान की छुट्टी #SaifAliKhan #SaifAliKhanNews pic.twitter.com/t0c4PrUbSx
— Ajit Singh Rathi (@AjitSinghRathi) January 21, 2025