Breaking News

शरद पवारांवरील पोस्टप्रकरणी चितळेला न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी सुट्टीकालीन न्यायालयाने दिला निर्णय

कोणीतरी अॅड नितीन भावेने लिहिलेली पोस्ट स्वत:च्या फेसबुकवर शेअर करून आपल्या बौध्दीक दिवाळखोर विद्धवतेचे प्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर उतरत वैयक्तिक टीका करणाऱ्या केतकी चितळे हीला सुट्टीकालीन न्यायालयाने १८ मे पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याचबरोबर चितळे हित्याविरोधात कळव्यानंतर पुणे, देहू, धुळे यासह अन्य काही ठिकाणी ८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणी चितळेला ठाणे पोलिसांनी काल शनिवारी अटक केल्यानंतर आज सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे.

केतकी चितळेने केलेल्या पोस्टवरुन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा गदारोळ निर्माण झाला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापासून ते विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही अशाप्रकारच्या आक्षेपार्ह भाषेच्या वापराला विरोध केला.

आज न्यायालयात केतकीने तिची बाजू मांडण्यासाठी वकील न घेता स्वतःच युक्तिवाद केला. केतकीला सकाळीच सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. तर, या आक्षेपार्ह पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची आवश्यकता असल्याचे ठाणे पोलिसांनी न्यायालयास सांगितले. त्यावर न्यायालयाने चितळे हीला १८ मे पर्यत पोलिस कोठडी सुनावली.

न्यायालयात स्वत:ची बाजू मांडताना चितळे हीने, समाजमाध्यमांवर स्वत:ला बोलण्याचे स्वातंत्र्य नाही का? असा सवाल तीने न्यायालयात उपस्थित केला.

तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी केतकी चितळे विरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल केलेली आहे. यावरून तिच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झालेली आहे. काल नवी मुंबईतील कळंबोली पोलिस ठाण्यातून बाहेर पडताना केतकीच्या अंगावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंडी आणि शाईफेक देखील केली होती.

दरम्यान सुणावनीवेळी न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्ये मोठ्या प्रमाणात आले होते. त्यामुळे सुणावनीनंतर न्यायालयाच्या मागच्या दाराने तिला पुन्हा पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

Check Also

प्रसिध्द कथ्थक नृत्यविशारद पंडित बिरजू महाराज यांचे निधन वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी ई-बातम्या टीम ख्यातनाम कथ्थक नृत्यविशारद आणि नृत्यातील पंडीत म्हणून ओळखले जाणारे पंडित बिरजू महाराज …

Leave a Reply

Your email address will not be published.