मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे विश्वासू साथीदार वाल्मिकी कराड यांचे नाव पुढे येत आहे. या दोघांवरही गुन्हे दाखल करावेत आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत काही अभिनेत्रींची नावे घेतली. त्यात हास्यजत्रा फेम प्राजक्ता माळी हिचेही नाव सुरेश धस यांनी घेतले. सुरेश धस यांच्या त्या वक्तव्यावरून अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी नापसंती व्यक्त करत ज्या कुस्तितपणे माझ्या नावाचा उल्लेख केला तितक्याच नम्रपणे माफी मागा असा इशाराही यावेळी दिला.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना प्राजक्ता माळी म्हणाल्या की, या प्राजक्ता माळी म्हणाल्या की, यासंदर्भात मी राज्याच्या महिला आयोगाकडे तक्रार केली असून त्यांच्याकडून कायद्याच्या चौकटीत कारवाई करण्यात येईलच, तसेच मीही कायद्याच्या चौकटीत राहुन सुरेश धस यांच्या विरोधात कारवाई करत राहणार असल्याचेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना प्राजक्ता माळी म्हणाल्या की, माझी आई रात्रभर झोपली नाही की मागील दिड महिन्यापासून तिच्या डोळ्याला डोळा नाही. सोशल मिडियावर त्यांनी केलेल्या वक्तव्याचे व्हिडिओ बनवून कसले चित्र विचित्र हेडिंग देत ते वक्तव्य व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना कोणत्या परिस्थितीला तोंड द्याव लागतंय याचा अंदाज नाही. एखाद्यावेळी कला क्षेत्रात काम करणारी महिला कलाकार डिप्रेशन मध्ये जाईल, किंवा ती आत्महत्येचा विचारही करेल. कला क्षेत्र बदनाम नाही तर ते अशा राजकारण्यांमुळे बदनाम होत असल्याचा आरोप करत मी बीडमध्येच कशाला महाराष्ट्रातल्या अनेक भागात जाऊन लोकांसाठी मनोरंजनाचे काम करते. माझे फक्त एकाच राजकारण्यासोबत फोटो नाही तर अनेक राजकारण्यांसोबत फोटो आहे म्हणून काय अशा पद्धतीने कुत्सित उच्चार करायचा का असा सवाल कलाक्षेत्रातील महिलांची नावे जितक्या सहतेने येतात तितक्या सहजतेने पुरुषांची नावे का पुढे येत नाहीत असा सवाल करत माझ्या भावाने सोशल मिडीयावरील त्याची सर्व खाती बंद करून टाकली असल्याचेही यावेळी सांगितले.
प्राजक्ता माळी पुढे बोलताना म्हणाल्या की, मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करते की, याबाबत ठोस कारवाई करावी अशी मागणी करत सुरेश धस यांचे नाव न घेता, त्या व्यक्ती जी दोन वाक्य बोलून गेले पण प्रसारमाध्यम त्यातूनच हजार व्हिडीओ बनवतं. इतके वाईट मथळे देतात की त्या मथळ्यामुळे समोरच्या माणसाचं आयुष्यात वादळ येऊ शकतं, त्याचं करिअर बरबाद होऊ शकते अशी उद्विग्न भावनाही यावेळी मांडली.
शेवटी बोलताना प्राजक्ता माळी म्हणाल्या की, जर हजार कार्यक्रमात हजार माणसांबरोबर नावं जोडली गेली तर राजकिय नेत्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला जातील का असा सवाल करत तेही कोणी धजावणार नाही. पुढे कला क्षेत्रात मुलं कोणी पाठविणार नाहीत. कलाक्षेत्र बदनाम नाही, ही सगळी मंडळी ते बदनाम करतात असा आरोपही यावेळी केला.