Breaking News

करण जोहरची पार्टी आणि “या” बॉलीवूड सिताऱ्यांना कोरोनाची लागण शाहरूख खान, कैतरीना कैफ, कार्तिक आर्यन यांना कोरोना

काही दिवसांपूर्वी नुकतेच वयाची ५० गाठली म्हणून प्रसिध्द निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने वाढदिवस साजरा करण्यासाठी जंगी पार्टी दिली. ही पार्टी यशराज फिल्मसच्या स्टुडिओत दिली. आता करण जोहरची पार्टी म्हटलं की बॉलीवूडचे तारे-तारका येणारच. या पार्टीला हजर राहिलेला बॉलीवूड बादशहा शाहरूख खान, कैतरिना कैफ यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली. या पार्टीतील जवळपास ५५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सध्या शाहरूख खान, कैतरिना कैफ आणि कार्तिक आर्यन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे.

तसेच हृतिक रोशन, कियारा आडवाणी, जान्हवी कपूर, मलायका अरोरा, करीना कपूर खान यांच्यासह इतर बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. पण आता मात्र त्याचं या जंगी सेलिब्रेशन कोरोनाचा सुपर स्प्रेडर इव्हेंट ठरल्याचं बोललं जात आहे. ‘बॉलिवूड हंगमा’च्या रिपोर्टनुसार, करण जोहरच्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या बॉलिवूड सेलिब्रेटींमधील जवळपास ५०-५५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पण बदनामीच्या भीतीने ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती देत नाहीयेत. सूत्रांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या माहितीनुसार, फिल्म इंडस्ट्रीतील करण जोहरच्या जवळच्या मित्रपरिवारातील बऱ्याच लोकांना या पार्टीनंतर कोरोनाचं संक्रमण झालं आहे.

अनेकांनी करोना संक्रमित असल्याची माहिती लपवली आहे. पण त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कार्तिक आर्यन करण जोहरच्या पार्टीमध्ये नव्हता. मात्र अभिनेत्री कियारा आडवाणी या पार्टीमध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे कार्तिकला तिच्यामुळे कोरोनाची लागण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. पार्टीमध्ये सहभागी झाल्यानंतर कियारानं कार्तिकसोबत त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन केलं होतं.

कियारा आडवाणी आणि कार्तिक आर्यन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘भूल भुलैय्या २’ अलिकडेच प्रदर्शित झाला. त्याआधी कार्तिक आणि कियारानं चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केले होते. कार्तिक आर्यननं नुकतीच करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. मात्र कियाराबाबत अद्याप अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही किंवा कियारानं यावर कोणतीही प्रतिक्रिया देखील दिलेली नाही. याशिवाय अभिनेता आदित्य रॉय कपूरला देखील करोनाची लागण झाली आहे.

Check Also

प्रसिध्द कथ्थक नृत्यविशारद पंडित बिरजू महाराज यांचे निधन वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी ई-बातम्या टीम ख्यातनाम कथ्थक नृत्यविशारद आणि नृत्यातील पंडीत म्हणून ओळखले जाणारे पंडित बिरजू महाराज …

Leave a Reply

Your email address will not be published.