Breaking News

छोट्या छोट्या गोष्टीतील सुख दाखविणारे दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे निधन ९० व्या वर्षी निधन

मुंबई: प्रतिनिधी
मानवी आयुष्य क्षणभंगुर असले तरी या वाट्याला आलेल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीत खुप मोठे सुख असते याची जाणीव नव्याने समाजाला करून देणारे प्रसिध्द दिग्दर्शक, पटकथाकारक बासू चटर्जी यांचे आज निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते.
त्यांचा जन्म अजमेर येथे १० जानेवारी १९३० रोजी झाला. चटर्जी यांनी सुरुवातीला कार्टुनिस्ट म्हणून रूजी कारंजीया यांच्या ब्लीट्झ या वर्तमानपत्रामध्ये काही काळ व्यथित केला. त्यानंतर त्यांनी आपले करिअर बदलत चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी प्रसिध्द दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांच्या तिसरी कसम या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून चित्रपटातसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर १९७० च्या दशकात त्यांनी स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून कामाला सुरुवात केली.
त्यांनी दिग्दर्शित केलेले खट्टा मिट्टा, चितचोर, पिया का घर, रजनीगंधा, छोटी सी बात, बातों बातों मे, शौकिन, अपने-पराये, स्वामी, मनपसंद, सारा आकाश, प्रियतमा, मंजिल आदी चित्रपटांचे दिग्दर्शन तर यातील काही चित्रपटांचे पटकथा लेखनही त्यांनी केले.
त्यांनी दिग्दर्शिक केलेल्या रजनी आणि ब्योमकेश बक्षी या दोन दूरचित्रवाणी मालिका त्याकाळी खुप गाजल्या. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात मध्यमवर्गीय कुटुंबाला भडसावणाऱ्या समस्या आणि त्यातच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सामावलेला आनंद कसा उपभोगायचा याचे उत्कृष्ट चित्रण आणि कथानक असायचे. त्यामुळे त्यांचे चित्रपट पाहताना चित्रपट रसिक आपले दु:ख विसरून जायचा.

Check Also

राज्यातील वृद्ध कलावंतांना सरकारकडून मिळणार थकीत मानधन सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वृद्ध कलावंतांचे थकित असलेले मानधन देण्याचा निर्णय राज्य शासनाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *