Breaking News

शेतकऱ्यांनो बोगस औषध कंपन्यापासून सावधान नुकसान झाल्यास थेट ग्राहक मंचाकडे धाव घ्याः अभ्यासक अभिजित झांबरे यांचा माहितीपर लेख

परवा तासगाव तालुक्यातील मणेराजुरी गावचे द्राक्षउत्पादक शेतकरी हिम्मत भोसले यांचा फोन आला. त्यांनी आपल्या द्राक्षबागेला पेस्ट लावण्यासाठी एका कंपनीचे औषध आणले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार हे औषध वापरुन तयार होणाऱ्या पेस्टचे मिश्रण फाटत होते. त्यामुळे औषध वाया जाऊन आणि पेस्ट लावणीसाठी आलेले मजूर खोळंबून त्यांचे साधारण दहाऐक हजाराचे आर्थिक नुकसान झाले होते. तसेच त्याच कंपनीच्या औषधाची पेस्ट वापरल्याने शेजारच्या शेतकऱ्याची द्राक्षबाग देखील फुटण्यास उशीर लागत असल्याची त्यांची तक्रार होती.
एकंदरीत त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन ती पेस्ट द्राक्षबागेला न लावण्याचा व त्या औषधाच्या मिश्रणाचे सॅम्पल तपासून घेऊन सदर औषध कंपनी विरोधात ग्राहक तक्रार मंचात दाद मागण्याचा सल्ला दिला. खरं तर अशा प्रकारची औषध वापरणे हे आपल्या शेतकऱ्यांनाच महागात पडू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील बागेसाठी औषध वापरताना जागरुक रहायला हवे. त्यासोबत अशा बोगस औषध कंपन्याविरोधात तत्काळ कृषी विभाग तसेच ग्राहकमंचाकडे तक्रार करायला हवी, जेणे करुन आपल्यासोबतच इतर शेतकऱ्यांचे नुकसान टळू शकेल.
त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांनी यापुढे सावधानता बाळगायला हवी. परंतु बऱ्याच वेळा आपल्या शेतकऱ्यांना ग्राहक मंच म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे हेच माहित नसते त्यामुळे या न्यायालयाकडे दाद कशी मागावी, या न्यायालयाकडे तक्रार केल्याने काय फायदा होतो हेच माहित नसते. त्यामुळे अनेकदा नुकसान होऊन देखील केवळ याबाबत माहिती नसल्याने शेतकरी शांतच राहणे पसंद करतात.
त्यामुळे आता थोडं ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहक मंचाविषयी जाणून घेऊया
ग्राहक संरक्षण कायदा – १९८६
देशातील ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्याच्या हेतूने केंद्र शासनाने २४ डिसेंबर १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणला. ग्राहकांच्या तक्रारीवर त्वरित निर्णय होऊन ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व्हावे म्हणून केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद तर ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि राज्य स्तरावर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग तर जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच (जिल्हा मंच) स्थापन करण्यात आले आहेत.
ग्राहक तक्रार निवारण मंचाचे कार्य
ग्राहकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे, ग्राहकाला त्याच्या हक्काची जाणीव करून देणे, त्याचे शोषण थांबविणे, ग्राहकाला त्याची गार्‍हाणी मांडण्यासाठी ग्राहक संरक्षण मंचाची जिल्हावार रचना करण्यात आली आहे. ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारींचा निपटारा करण्याचे काम मुख्यत्वे या मंचांकडून होत असते. एखाद्या ग्राहकाला जिल्हा मंचाकडून दिलेला निर्णय मान्य नसेल तर त्याविरुद्ध तो राज्य आयोगाकडे दाद मागू शकतो. राज्य आयोगानेही त्याच्या तक्रारीची दखल घेऊन त्याला न्याय दिला नाही तर तो त्या तक्रारीविरुध्द केंद्र शासनाच्या आयोगाकडे दाद मागू शकतो. यामध्ये सर्वसामान्यांना परवडेल अशी ग्राहक मंचांसाठी फी ठेवलेली असते. ९० दिवसांच्या आत ग्राहकांच्या तक्रारींचे या मंचांनी निराकरण करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील विविध जिल्ह्यात ४० ग्राहक तक्रार निवारण मंचाची कार्यालये आहेत. त्यापैकी काही जिल्ह्यांतील कार्यालयाची माहिती आपल्या शेतकरी मित्रांसाठी या ठिकाणी देत आहे. जर आपली एखाद्या औषध, खत विक्रेत्या कंपनीकडून फसवणूक झाल्यास अथवा त्या कंपनीच्या औषधे / खतांच्या वापराने द्राक्षबागेचे/ शेती पिकांचे नुकसान झाल्यास थेट खालील कार्यालयाशी संपर्क करुन आपली तक्रार नोंदवावी.

सांगली – जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच
पत्ता – शासकीय विश्रामगृह माधव नगर रोड चे मागे, न्‍यु प्राईड मल्टिप्‍लेक्‍स थिएटर चे जवळ, सांगली 416 416.,
संपर्कासाठी दूरध्‍वनी व फॅक्‍स क्रमांक – 0233 – 2621747 ,
ई-मेल आयडी – [email protected]

नाशिक – जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच*
पत्ता – मा.जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे आवारात, प्रांत कार्यालयाचे शेजारी, नाशिक.
दुरध्‍वनी व फॅक्‍स क्र. – 0253-2580142.
ई-मेल आयडी – [email protected]

सोलापूर – जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच
पत्‍ता – जिल्‍हाधिकारी कार्यालय आवार, जिल्‍हा कोषागार कार्यालयाचे पाठीमागेप्रशासकीय इमारत जवळ सोलपूर 413 001.
दुरध्‍वनी व फॅक्‍स क्र. – 0217-2622003
ई-मेल आयडी – [email protected]

पुणे – जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच
पत्‍ता- नवीन प्रशासकीय इमारत, डी विंग, तिसरा मजला, विधान भवनासमोर, पुणे-411 00
संपर्कासाठी दुरध्‍वनी क्र. – 020-26139191
ई-मेल – [email protected]

सातारा – जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच
पत्‍ता – सदर बझार,जिल्‍हा न्‍यालयासमोर कोरेगाव रोड, सातारा,
संपर्कासाठी दूरध्‍वनी व फॅक्‍स क्रमांक -02162/237469,
ई­ मेल आयडी – [email protected]

अहमदनगर – जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच
पत्‍ता – पराग बिल्‍डींग,जिल्‍हाधिकारी कार्यालयाजवळ, अहमदनगर – 414 001
संपर्कासाठी दूरध्‍वनी व फॅक्‍स क्रमांक – दूरध्‍वनी क्रमांक – 0241- 2347917
ई-मेल आय डी – [email protected]

जालना – जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच
पत्‍ता – औरंगाबाद-अंबड बायपास रोड, सर्वे नंबर 488, जिल्‍हा क्रिडा संकुल समोर, जालना- 431213
संपर्कासाठी दूरध्‍वनी व फॅक्‍स क्रमांक – 02482-225473 02482-225473
ई-मेल आयडी – [email protected]

*औरंगाबाद.- जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच*
पत्‍ता – जिल्‍हाधिकारी इमारत, दुसरा मजला,औरंगाबाद.
संपर्कासाठी दुरध्‍वनी व फॅक्‍स क्रंमाक – 0240/2321202
ई-मेल आयडी – [email protected]

*उस्मानाबाद – जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच*

पत्‍ता – जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर, उस्‍मानाबाद 413501
संपर्कासाठी दूरध्‍वनी व फॅक्‍स क्रमांक -( 02472 ) 22347
ई­ मेल आयडी [email protected]

*अधिक माहितीसाठी संपर्क*
अभिजित झांबरे-पाटील,
मोबाईल क्र -7738675353
[email protected]

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *