Breaking News

पाठिंबा म्हणून एक दिवस अन्नत्याग; उपाध्यक्षांच्या भूमिकेने त्या पदाचे प्रचंड अवमूल्यन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी

राज्यसभेच्या उपाध्यक्षांची भूमिका ही सदनाकडे व सदस्यांकडे बघण्याची ती त्या सदनाच्या प्रतिष्ठेची त्या पदाचा प्रचंड अवमूल्यन करणारी आहे. त्यामुळे सदस्यांनी जे अन्नत्याग उपोषण केले त्याला पाठिंबा देत आज एक दिवसाचे अन्नत्याग करत उपाध्यक्षांच्या तथाकथित गांधीगिरीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकरी बील आणि मराठा आरक्षण, कांदा निर्यात बंदी या विषयासह पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देवून त्यांच्या मनात निर्माण झालेल्या शंकांचे निरसन केले.

देशाच्या राज्यसभेत कृषी विषयक दोन-तीन बिलं येणार होती. परंतु ती बिलं लगेच येतील असं नव्हतं. यातून असं दिसलं की, ही बिलं तातडीने मंजूर करावी याप्रकारचा आग्रह सत्ताधाऱ्यांचा होता. या बिलासंदर्भात सदस्यांना प्रश्न त्यांच्या शंका आणि मतं व्यक्त करायची होती. त्याप्रकारचा आग्रह त्यांनी धरला होता. हा आग्रह बाजूला ठेवून सदनाचे कामकाज पुढे रेटवून नेण्याचा प्रयत्न असावा. परंतु सदस्यांनी हे सगळं नियमाच्या विरोधात आहे. हे पुन्हा पुन्हा सदस्य नियमांचे पुस्तक घेऊन सांगत असताना त्यांना प्रतिसाद न देता त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने सदस्यांच्या भावना तीव्र होवून ते वेलमध्ये धावले. नियमांचा आधार घेऊन सांगत असतील तर कोणता नियम सांगत होते ते ऐकून घेण्याची अपेक्षा उपाध्यक्षांकडून होती. पण तो विचार न करता तातडीने मतदान घेण्याचा व आवाजी पध्दतीने मंजूर करण्याचा प्रयत्न त्यामुळे सदस्यांची प्रतिक्रिया तीव्र असल्याचे त्यांनी सांगितले.

माझ्यासारख्याची अपेक्षा होती की,सदनाच्या प्रमुखांकडून विशेषतः उपाध्यक्षांकडून… चेअरवर होते त्यांच्याकडून या सगळ्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची त्यांचं ऐकण्याची व त्यांना बोलण्याची संधी देण्याची. मी राज्य आणि देशाच्या विधिमंडळात व सदनात ५० वर्षापेक्षा जास्त काम केले. पीठासीन अध्यक्षांकडून यापध्दतीचं वर्तन मी पाहिलं नाही. मला आणखी एका गोष्टीचा धक्का बसला की, बिहारमधील एक अत्यंत ज्येष्ठ नेते आणि संसदीय पध्दतीने व लोकशाही पध्दतीचे जाणकार असताना त्यांनी त्यांच्या या विचारांना तिलांजली देण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला.

सदस्यांनी आपली तीव्र भावना किंवा प्रतिक्रिया दिली तर त्यांना ताबडतोब बडतर्फ करून त्यांचे अधिकार काढले. साहजिकच त्याची प्रतिक्रिया येणारच. ते सर्व सदस्य उपाध्यक्षांच्या या भूमिकेमुळे आत्मक्लेष करण्यासाठी गांधीजींच्या पुतळ्याजवळ धरणं धरलं आहे. आतापर्यंत त्यांनी सोडलंय का माहित नाही. परंतु त्यांनी आपल्या भावना सदनात आणि सदनाबाहेर शांततेने व्यक्त केल्या आहेत. उपाध्यक्षांनी नियमांना महत्त्व न देता सदस्यांचे मुलभूत अधिकार नाकरले. हे करून पुन्हा जे सदस्य उपोषण करत आहेत त्यांना चहापान घेवून गेले. मात्र त्या सदस्यांनी त्यांचा चहापान नाकारला. चहाला हात पण लावला नाही. त्यांचा हा गांधीगिरीचा भाग होता असं ऐकलं. परंतु यापूर्वी गांधीगिरीची बेईज्जत झाली नव्हती ती त्याठिकाणी घडल्याचा उपरोधिक टीका करत बिलावर हवी तशी चर्चा होवू शकली नाही म्हणजे होवू दिली नाही. आवाजी मताने बिलं मंजूर करण्याची वेळ आताच का आलीय असा सवालही त्यांनी यावेळी केला.

काल म्हणजे सोमवारी दिल्लीत जाता आलं नाही यांचं कारण शरद पवारांनी सांगत सुप्रीम कोर्टात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मराठा आरक्षणासंदर्भात अपील करण्याची गरज होती. महाराष्ट्राच्या विधीमंडळात एकमुखाने निर्णय घेतला तो जतन व टिकवला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून गेले दोन दिवस मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांसोबत व कायदेशीर जाणकार यांच्याशी चर्चा केली. आपणच छापलं आहे दाखवलं आहे. काल सुप्रीम कोर्टात अपील दाखल केल्याचे. अपील लवकर दाखल करण्याची आवश्यकता होती. कारण महाराष्ट्रातील तरुण पिढीमध्ये या प्रश्नांसंदर्भात एकप्रकारची अस्वस्थता दिसत होती. या कारणामुळे थांबावं लागलं हे सांगतानाच मात्र संसदेचे कामकाज मी बघत होतो. राज्यसभेत कधी घडत नाही किंवा कधी बघायला मिळत नाही असे दृष्य बघायला मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती, कांदा उत्पादन यावर बोलतानाच देशभरातील शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे. त्याला आमचा नक्की पाठिंबा असेल असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *