Breaking News

“मग हे देशमुख कोण?” फडणवीसांचा पवारांना सवाल फडणवीसांच्या प्रश्नावर देशमुखांचा खुलासा

मुंबईः प्रतिनिधी
परमबीर सिंग यांच्या आरोपातील तथ्य खोडून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत गृहमंत्री देशमुखांची बाजू मांडत असतानाच मुंबईतून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांनीच १५ फेब्रुवारी २०२१ रोजी पत्रकार परिषदेचे केलेले ट्विट रिट्विट करत थेट मग हे कोण असा सवाल पवारांना सवाल केला.
अनिल देशमुख हे १५ फेब्रुवारी पर्यंत नागपूर येथील रूग्णालयात कोविड१९ ची लागण झाल्याने दाखल होते. त्यानंतर ते गृह विलगीकरणात असल्याची कागदपत्रांच्या आधारे शरद पवार प्रसारमाध्यमांना दाखवित सांगत होते.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या ट्विटचा आधार घेत १५ फेब्रुवारीचे ते ट्विट फडणवीसांनी रिट्विट करत मग हे देशमुख कोण? असा सवाल करत शरद पवार यांच्या खुलाशातील हवाच काढून घेण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला.
दरम्यान पवारांची पत्रकार परिषद सुरु असतानाच फडणवीस यांनी हे ट्विट केल्याने तेथील पत्रकारांनी पवारांवर प्रश्नांची सरबती सुरु केली. त्यावर पवारांनी या विषयातील मुख्य मुद्दा हा मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी हा असून ती कोणी ठेवली कशासाठी ठेवली हे प्रश्न आहेत. त्याबाबत बोलण्याऐवजी भलतीच कडे विषय चर्चिला जात असून विषयांतर करू नका अशी सूचनाही त्यांनी केली.

फडणवीसांच्या या हल्ल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली असून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र फडणवीसांच्या या सवालावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खुलासा करत म्हणाले की, रूग्णालयातून सोडण्यात आले त्या दिवशी अनेक पत्रकार रूग्णालयाच्या आवारात माझी बाईट घेण्यासाठी आले होते. तसेच माझ्या शरीरात अवसान नसल्याने मी आवारातच पत्रकारांशी बोलल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर २७ फेब्रुवारी पर्यंत आपण गृहविलगीकरणात होतो. २८ तारखेला आपण घरातून फक्त सह्याद्री अतिथीगृहात गेल्याचे सांगितले.

Check Also

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी कौशल्य विकास मंडळाचा पुढाकार कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने पुढाकार घेतला असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *