Breaking News

फडणवीस आणि भाजपाच्या रूपाने मजबूत विरोधी पक्ष आम्ही दिला मंत्री छगन भुजबळ यांचा भाजपा नेते फडणवीसांना उपरोधिक टोला

मुंबईः विशेष प्रतिनिधी

विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी समोर मजबूत विरोधी पक्ष दिसत नसल्याची टीका करत होते. मात्र त्यांच्या व भाजपाच्या रूपाने राज्यातील जनतेला सशम आणि मजबूत विरोधी पक्ष दिल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना उपरोधिक टोला लगाविला. त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात एकच हशा उसळला.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीने विश्वासमत दर्शक ठराव जिंकल्यावर ते मनोगत व्यक्त करताना बोलत होते.

शपथविधी सोहळ्यावेळी राज्यपालांनी दिलेल्या शपथेचा मुळ गाभा आम्ही वाचलाय त्याच्या आधी आणि नंतरचे जे काही आहे ते आपोआप वगळले गेल्याचा दावा त्यांनी केला.

शपथविधी सोहळ्या दरम्यान राज्याच्या महापुरूष आणि माता-पित्यांची नावे घेतल्यावरून ते टीका करत आहेत. मात्र भाजपा त्यांच्या मित्रपक्षाचे झाले नाहीत त्यांना महापुरूष आणि माता-पित्यांचे कधी होणार असा सवाल करत छत्रपती शिवराय, डाँ. आंबेडकर, फुले, शाहू महाराज यांचे नाव घेतल्याने फडणवीस आणि भाजपाला राग का आला असा सवाल करत या महापुरूषांबद्दल त्यांची भावना चांगली नसेल म्हणूनच त्यांना राग आला असण्याची शक्यता असल्याची टीका मंत्री जयंत पाटील यांनी केली.

तसेच विधानसभा सभागृहाचे विरोधी पक्षनेता अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाची स्पर्धा ठेवावी असे सांगत फडणवीस की चंद्रकांत पाटील अशी स्पर्धा व्हायला हरकत नसल्याचे मतही त्यांनी मांडले.

यावेळी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान फडणवीस हे सतत विरोधी पक्षनेता नसल्याबाबत वक्तव्य करत असल्याची आठवण करून देत त्यावेळी त्यांना आपण फडणवीस यांना आरशात पाहण्याचा सल्ला देत त्यात पाहिल्यास आपणच विरोधी पक्षनेते म्हणून स्वतःला दिसाल अशी उपरोधिक टीका केली.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *