Breaking News

शरद पवारांचे विश्वासू माजी आमदार युनुसभाई शेख यांचे निधन वयाच्या ८० व्या वर्षी निधन

सोलापूर : प्रतिनिधी
शहरातील राजकारणात काँग्रेस असो वा राष्ट्रवादी काँग्रेस असो मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार युनुसभाई शेख यांचे आज वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या पश्चात चार मुले तीन मुली असा परिवार आहे.
सोलापूर महापालिकेत पहिल्यांदा १९६९ साली नगरसेवक म्हणून निवडून येत त्यांच्या निवडणूक राजकारणाची सुरुवात झाली. १९७५ आणि १९८५ साली सलग तीनवेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. १९७५ साली शरद पवार हे सोलापूर जिल्ह्याचे पालममंत्री असताना शेख यांना महापौर पदी निवडूण आणले. त्यानंतर १९९० साली विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडूण गेले. १९९८ साली त्यांचा सुभाष देशमुख यांच्याकडून पराभव झाला. मात्र सोलापूरच्या राजकारणात ते नेहमी शरद पवार यांचे विश्वासू म्हणूनच परिचित होते. त्यांच्या निधनाबद्दल शरद पवार यांनी माझे विश्वासू सहकारी माजी आमदार व सोलापूरचे माजी महापौर युनुसभाई शेख यांचे निधन चटका लावणारे आहे. सोलापूर शहराच्या विकासात युनुसभाईंचे मोठे योगदान आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात अविरत सक्रिय उमदे नेतृत्व हरपले असल्याची भावना व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *