Breaking News

ईव्हीएम मशिन्स हँक करून गडबड केली जावू शकते शरद पवार यांच्यासह सर्व विरोधी पक्षांना भीती

मुंबईः प्रतिनिधी
लोकांचे मत सरकारविरोधी आहे. हे अनेक मतदारसंघात फिरल्यानंतर आपल्याला समजले. परंतु ईव्हीएम मशीन हॅक करुन किंवा ईव्हीएम मशीनमध्ये गडबड केली जाऊ शकते अशी भीती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
काल बारामती मतदारसंघातील प्रचाराची मुदत संपली. नंतर शरद पवार यांनी मतदार नसल्यामुळे मतदारसंघात राहू नये अशी तक्रार भाजपने निवडणूक आयोगाकडे केली. परंतु माझं मतदान मुंबईमध्ये असले तरी माझं घर बारामतीत आहे .त्यामुळे मी थांबू शकत होतो. परंतु थांबू दिले गेले नसल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टिडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, माजी मुख्यमंत्री व कॉग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, आपचे खासदार संजय सिंग, सीपीआयचे महेंद्र सिंग, पीसीसीचे (आयएनसी) चे व्हाईस प्रेसिडेंट शांती चौहान, तृणमुल काँग्रेसचे खासदार नजमुल हक, इंडियन युनियन मुस्लिम लीगचे खोरुम ओमर, ऑल इंडिया फॉवर्ड ब्लॉकचे जनरल सेक्रेटरी डॉ.जी.एच.फनार्डींस, लोकतांत्रिक जनता दलाचे कपिल पाटील, डीएमकेचे खासदार टी.के.एस.इलानगोवल, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार आणि पक्षाचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

व्हीव्हीपॅटच्या ५० टक्के स्लीपची मोजणी करण्यात यावी अशी मागणी देशातील २३ पक्षांनी केली असल्याची माहिती आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही यावेळी केली.
Save The Nation, Save Democracy या विषयाचे प्रेझेंटेशन आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडून यावेळी करण्यात आले.
सत्ताधारी पक्षाकडून ईडी, आयकर विभाग, सीबीआय यांचा गैरवापर होत आहे. देशातील संस्थांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जात आहे. निवडणूक आयोग देखील याला अपवाद नाहीअसा आरोपही त्यांनी केला.
आयकर विभागाकडून विरोधी पक्षांना टार्गेट केले जात आहे. निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मशीनबरोबर छेडछाड होत आहे. आम्ही मागच्या अनेक दिवसापासून ईव्हीएम मशीन प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. आमच्या निदर्शनास आले आहे की, ईव्हीएम मशीन मॅनिप्युलेट केली जावू शकते. १९१ देशांपैकी फक्त १८ देशांनी ईव्हीएम यंत्रणा वापरली आहे. यातील अनेक देश विकसनशील देशात मोडतात. बॅलटिंग पॉईंट, व्हिव्हिपॅट आणि कंट्रोल युनिट असे तीन डिव्हाईस सध्या मतदानासाठी वापरल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
व्हिव्हिपॅटसाठी ९ हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. पोलिंग ऑफिसर आणि पोलिंग बुथवरील कर्मचारी हे तांत्रिकदृष्ट्या विकसित नाहीत. शिवाय ईव्हीएम मशीनचे ऑडिट करणारे कुणीही तज्ज्ञ नाही. लोकांच्या पैशातून ९ हजार कोटी खर्च केले फक्त ५ वर्षातून एकदा वापरण्यासाठी. मत दिल्यानंतर स्लीप मिळण्यासाठी ७ सेकंद लागत आहेत. आम्ही प्रश्न विचारतोय की, एवढा वेळ का लागतो? एक ट्विटर पोल घेण्यात आला त्यात २२ टक्के लोकांनी ७ सेकंद लागल्याचे सांगितले. तर ५५ टक्के लोकांनी ४ सेकंद लागत असल्याचे सांगितले अशी माहिती यावेळी दिली.
निवडणूक आयोगाने किमान ५० टक्के ईव्हीएम मशीन्स स्लीप चेक कराव्यात. ईव्हीएम आणि व्हिव्हिपॅट स्लीपच्या काऊंट जर वेगळा असेल तर व्हिव्हिपॅट स्लीप्स प्रिवेल कराव्यात असेही ते म्हणाले.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथे तांत्रिकदृष्ट्या कौशल्यप्राप्त लोक राहतात. त्यामुळे आम्ही मुंबईत पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट करत मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. कृषी क्षेत्राचे नुकसान झाले आहे. देशभरातील शेतकरी या सरकारला कंटाळला आहे. युवकांना रोजगार नाही. उद्योजक कंटाळलेले आहेत.महाराष्ट्रातील शेतकरीही आत्महत्या करत आहेत. एखाद्या राजकीय पुढाऱ्याने जर आवाज उचलला तर त्याच्या घरी ईडी किंवा आयकर विभाग धाड टाकतो. तीच अवस्था सनदी अधिकाऱ्यांचीदेखील होत असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्वीट करुन निवडणूकीबाबत आक्षेप नोंदवला आहे. सीताराम येचुरी यांनी देखील ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात भाजपची अवस्था वाईट आहे. इथे सर्व जागा आघाडीने जिंकल्या पाहिजेत. उत्तरप्रदेशमध्ये देखील त्यांच्या विरोधात वातावरण आहे. मग भाजपला मतदान कसे होणार फक्त ईव्हीएम मशीन्स हॅक करुन का असा सवालही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
जर्मनीमध्ये ईव्हीएम वापरणे हे लोकशाहीच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. अमेरिका आणि इतर विकसित देशांनी ईव्हीएम मशीन नाकारल्या आहेत. २००९, २०१४ आणि आता मी ईव्हीएम विरोधात लढा देत आहे आणि पुढेही देत राहिन असेही त्यांनी स्पष्ट केले.

तर आपचे खासदार संजय सिंग यांनी गोव्यात ईव्हीएम मशीनचे मॉक ड्रिल केले गेले. प्रत्येक पक्षाला ९ – ९ मत दिली गेली. मात्र निकालाचे बटण दाबले असता भाजपला १७ मतदान झाल्याचे निदर्शनास आल्याची बाब पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केली. तर आज उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज ट्वीट करुन ३५० ईव्हीएम मशीन्समध्ये फेरफार केल्याचे निदर्शनास आणून दिले असल्याचे सांगतानाच निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून बसल्याचा आरोप संजय सिंग यांनी यावेळी केला.
२३ पक्ष ज्यांच्याकडे ७० टक्के मतदार आहेत. जे ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्यांना का नाकारले जात आहे. मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, ही आमची मागणी आहेच. मात्र निवडणूक जवळ आल्यामुळे या मागणीवर ठाम राहता येत नाही. त्यामुळे आम्ही एक पाऊल मागे येत फक्त मतमोजणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता यावी ही मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *