Breaking News

ज्या देशांनी लॉकडाऊन लावला त्यांनी आर्थिक मदतही दिली, बरं का मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना प्रतित्तुर

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना लॉकडाऊनचा अंतिम पर्याय असल्याचे जाहिर केले. परंतु मुख्यमंत्र्यांनी ज्या देशांची नावे घेत तेथील परिस्थितीमुळे पुन्हा लॉकडाऊन लावाला लागला त्या देशांनी अर्थात फ्रांसने तिसऱ्यांदा लॉकडाऊन लावला पण, १२० अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले. हंगेरीत ‘वर्क फ्रॉम होम’ सुरु केला पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला. डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती पण, एप्रिल २०२० मध्येच सर्वच घटकांना पॅकेज. ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत पण, २ लाख २० हजार, उद्योग आणि ६ लाखांवर कर्मचार्‍यांना मदत एवढेच नाही तर वेतन न मिळणार्‍यांना ८०० युरोंपर्यंत मदत केली. बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय पण, २० बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय. पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे पण, १३ बिलियन युरोचे पॅकेज मार्च २०२० मध्येच जाहीर केले. आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत पण, ७.४ बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय. फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत पण, ३.४ बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय. युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही दिलंय. तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी, एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा! असल्याचे प्रतित्तुर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देत राज्यातील जनतेला आर्थिक मदत जाहिर करण्याची मागणी केली.

विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही, तर आपण प्रत्यक्ष काय करतो, याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल. होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्याना लगावला.

Check Also

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी कौशल्य विकास मंडळाचा पुढाकार कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने पुढाकार घेतला असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *