Breaking News

अखेर नाराज खडसेंनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याची घोषणा राष्ट्रवादीकडून २३ तारखेला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची प्रदेशाध्यक्ष पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

गेल्या चार वर्षापासून माझ्यावर अन्याय होत असल्याची भावना वेळोवेळी जाहीरपणे बोलून दाखविणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर आज सका‌ळी भाजपाला सोडचिठ्ठी देत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दुपारी दिली.

एकनाथ खडसे यांच्यावर भाजपामध्ये अन्याय झाला आहे. ते काही एका मतदारसंघ किंवा विभागापूरते मर्यादीत नाहीत. त्यांचा राज्यातील अनेक भागात संपर्क आहे. यासंदर्भात सकाळी त्यांच्याशी बोलणे झाले, त्यावेळी त्यांनी आपण भाजपा सोडल्याचे सांगत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे खडसे यांनी सांगितल्याने त्यांच्या पक्षप्रवेशाचा रितसर कार्यक्रम शुक्रवारी दुपारी २ वाजता होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील भाजपामधील अनेक आमदार, नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास उत्सुक आहेत. मात्र सध्या कोरोनाचा काळ असल्याने आम्ही आताच किंवा खडसेंसोबत इतरांना प्रवेश देणार नाही. कारण आम्हाला लगेच विधानसभेच्या निवडणूका घडवून आणायच्या नसल्याचे स्पष्ट करत बाकिच्यांना टप्प्याटप्प्याने प्रवेश देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसे यांच्या भाजपा सोडचिठ्ठीची घोषणा केल्यानंतरही भाजपाकडून अधिकृत घोषणा किंवा त्याविषयीचे वक्तव्य जाहीर केले नव्हते. अखेर त्यानंतर तब्बल तासभरानंतर भाजपाने खडसेंच्या राजीनाम्याचे पत्र मिळाल्याचे माहिती प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Check Also

केंद्राकडे बोट दाखविणारे आघाडी सरकार या नाकर्तेपणाचे उत्तर देणार का ? केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा सवाल

जालना: प्रतिनिधी केंद्र सरकारने गेल्या वर्षी लॉकडाऊन च्या कालावधीमध्ये गोरगरीबांना देण्यासाठी पाठवलेली ६ हजार ४४१ मेट्रिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *