Breaking News

बदनामी झाल्याने एकनाथ खडसे यांची पुन्हा सरकारवर आगपाखड तर आमदारांवर आरोप करणाऱ्यांची चौकशी करण्याची आमदार हितेंद्र ठाकूर यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी

२५ ते ३० वर्षाच्या काळात सभागृहाचा सदस्य असताना एकही आरोप झाले नाहीत. मात्र मंत्री पदावर बसल्यावर माझ्यावर वारेमाप आरोप करण्यात आले. त्या आरोपांची अँण्टी करप्शन, सीआयडी, लोकायुक्त मार्फत चौकशी केली. मात्र त्यातील माझ्यावरचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही. जनतेसमोर नाथाभाऊ कसा नालायक आहे हे भासवण्याचा खोडसाळ आरोप करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. अशा पध्दतीचे बेछूट आरोप करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करणार का ? असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी करत कारवाईबाबत धोरण स्पष्ट करावे असे आवाहनही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेत केले.

दरम्यान वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर आणि माझ्यावर काही जणांनी आरोप करत आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आमदारांवर कोणीही कथित ऑडिओ क्लिप जाहीर करून  बेछूट आरोप करतात. लोकप्रतींधींना बदनाम करतात. अशांची चौकशी झाली पाहिजे असा मुद्दा उपस्थित करत आरोप करणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली.

याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अशा घटनांची गंभीर दखल घेतली. तथ्यहीन आरोप करून लोकप्रतिनिधींची बदनामी करणाऱ्यांवर काय कारवाई करता येऊ शकेल याबाबत नियम तपासले जातील असे आश्वासन दिले. त्याबरोबर सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवन्यही सूचना केली.

 

Check Also

नाना पटोले यांचा हल्लाबोल; वन नेशन, वन इलेक्शन, नो अपोझिशन ही मोदी सरकारची कार्यपद्धती

लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या असताना विरोधकांशी सरळ दोन हात करण्याची हिम्मत भारतीय जनता पक्ष व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *