Breaking News

खडसेंच्या नाराजीनाट्यात मुनगंटीवार करणार मध्यस्थी विधीमंडळ किंवा संसदेवर पाठविण्याची स्पष्टोक्ती

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील भाजपाच्या पक्षांतर्गत राजकारणातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हटाव मोहिम काही केल्या थांबायला तयार नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही नाराजी सातत्याने जाहीर करणे सुरुच ठेवल्याने माजी मंत्री विनोद तावडे यांच्या अयशस्वी प्रयत्न नंतर आता माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे खडसेंची नाराजी दूर कऱण्यासाठी मध्यस्थी करणार असल्याचे स्पष्ट झाले.
ऐन विधानसभा निवडणूकीत एकनाथ खडसे यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यामुळे चिडलेल्या खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठविली. त्यामुळे अखेर खडसे यांच्याऐवजी त्यांच्या कन्या रोहीणी खडसे यांना शेवटच्या टप्प्यात उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांचा पराभव झाला. त्यामुळे कन्येचा झालेला पराभव हा फडणवीस आणि जळगावातील त्यांचे प्रतिस्पर्धी गिरीष महाजन यांच्यामुळेच झाल्याचा आरोप खडसे यांनी करत पक्षांतराची तयारी सुरु केली.
त्यातच माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीही १२ डिसेंबर २०१९ रोजी जाहीर सभा घेत पक्षनेते अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. तसेच माझ्या पराभवासाठी दुसऱ्या पक्षातील व्यक्तीला निवडणूकीत मदत केल्याचा आरोप त्यांनी याच सभेत केला. त्यामुळे हे नाराजी नाट्य भलतेच रंगणार असल्याचे चित्र निर्माण झाले.
यानंतर खडसे यांनी पक्ष बदलाच्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र या दोन्ही पक्षांकडून समाधानकारक आश्वासन न मिळाल्याने त्यांनी पक्षांतराचा निर्णय रद्द केला.
दरम्यानच्या कालावधीत खडसे यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री विनोद तावडे यांनी प्रयत्न केले. मात्र त्यांच्या मध्यस्थीने खडसे काही शांत झाले नाहीत.
आता पुन्हा खडसे यांनी, भाजपाला सगळे चालतात मग की का नाही? असा सवाल करत आपली खदखद पुन्हा एकदा व्यक्त केली. परंतु आता खडसे यांची सततची नाराजी आगामी काळात पक्षाला अडचणीची ठरू शकते याचे राजकिय गणित लक्षात घेवून माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेण्याचे ठरविले आहे. तसेच आगामी काळात खडसे यांना विधिमंडळात किंवा संसदेत स्थान मिळेल असे सांगत खडसे यांच्या राजकिय पुर्नवसनाचे संकेत दिले. त्यांच्या या मध्यस्थीला यश येणार की…… येणारा काळच उत्तर देईल.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *