Breaking News

महाराष्ट्राच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा राज्याला मिळाला ई पंचायतराज पुरस्कार

मुंबई : प्रतिनिधी

आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून ई-पंचायत क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने दरवर्षी भरीव कामगिरी केली असून यावर्षी देखील ही उज्वल परंपरा पुढे चालू ठेवली आहे. याची पोचपावती म्हणून केंद्र शासनाने ई-पंचायत पुरस्कार – २०२०  चा तृतीय पुरस्कार देऊन महाराष्ट्र राज्याचा गौरव केला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी  तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने हा पुरस्कार स्विकारला. ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंदकुमार, उपसचिव प्रविण जैन उपस्थित होते.

ई-पंचायत क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या देशातील 3 राज्यांना दरवर्षी ई-पंचायत पुरस्कार देण्यात येतो. भारतीय घटनेतील ७३ व्या घटना दुरुस्तीनंतर भारतीय घटनेच्या कलम २४३ नुसार पंचायत राज संस्थांना महत्वपूर्ण अधिकार देण्यात आले असून केंद्र व राज्य सरकारच्या बहुतांशी विकास योजना या पंचायत राज संस्थामार्फत राबविण्यात येतात. पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण करुन त्यांच्या कारभारात सुसूत्रता व पारदर्शकता आणण्याच्या हेतूने केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत ई-पीआरआय (e-PRI) हा उद्देश मार्ग प्रकल्प (Mission Mode Project) सन २०११ पासून हाती घेतला आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पंचायती राज संस्थांच्या कारभारामध्ये ई-पंचायत प्रकल्पांतर्गत अभिप्रेत असलेली एकसूत्रता व पारदर्शकता आणणे, नागरिकांना विविध प्रशासकीय विभागांतर्गत सेवा-दाखले त्यांच्या रहिवाशी क्षेत्रात कालबध्द स्वरुपात मिळणे, तसेच इतर व्यावसायिक सेवा, जास्तीत जास्त बँकीग सेवा ग्रामीण जनतेला एकाच केंद्रावर मिळाव्या या हेतूने राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये CSC e-Governance Services India Ltd. या केंद्र शासनाच्या कंपनीच्या सहकार्याने “आपले सरकार सेवा केंद्र (ASSK)” स्थापन करण्यात आले आहेत.

Check Also

अखेर भाजपाचा “संकल्प पत्र” जाहिरनामा प्रसिध्द

देशातील प्रमुख राष्ट्रीयस्तरावरील पक्षांकडून लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकृष्ट करण्यासाठी जाहिरनामा प्रसिध्द केला. आतापर्यंत मार्क्सवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *