Breaking News

जीएसटीतून सलग तिसऱ्या महिन्यात १ लाख कोटींचं उत्पन्न अर्थव्यवस्था लागली रूळावर यायला

मुंबईः प्रतिनिधी
चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला देशाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला. पण आता अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये जीएसटी कलेक्शन ५ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. सप्टेंबर महिन्यात जीएसटीपासून १ लाख १७ हजार १० कोटी रुपयांचा महसूल सरकारला मिळाला आहे. जीएसटी संकलन सलग तिसऱ्या महिन्यात १ लाख कोटी रुपयांवर गेले आहे.
अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये सरकारचे जीएसटी संकलन १.१२ लाख कोटी रुपये होते. तर जुलै २०२१ मध्ये हा आकडा १.१६ लाख कोटी रुपये होते. याआधी जूनमध्ये जीएसटीपासून ९२,८४९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. एप्रिल आणि मे महिन्यातही जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होते.
सप्टेंबरच्या जीएसटीची तुलना मागील वर्षीच्या याच महिन्याच्या आकडेवारीशी केली तर या वर्षी सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलन सप्टेंबर २०२० च्या तुलनेत २३ टक्के आणि सप्टेंबर २०१९ पेक्षा २७ टक्के अधिक आहे.
अर्थ मंत्रालयाने ऑगस्टसाठी ई-वे बिल डेटा देखील जारी केला आहे. त्यानुसार ऑगस्टमध्ये ६.५८ कोटी ई-वे बिले तयार झाली. तर जुलैमध्ये ही संख्या ६.४१ कोटी होती. विशेष म्हणजे सरकारच्या जीएसटी संकलनातील ही वाढ कोविडशी संबंधित अनेक मदत वस्तूंवर कर सूट दिल्यानंतरही आली आहे. जीएसटी संकलनात सातत्याने होणारी वाढ हे सरकार आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगले लक्षण असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सिक्कीममध्ये जीएसटी संकलनात सर्वाधिक वाढ झाली आहे. सिक्कीममधील जीएसटी संकलनात सप्टेंबर २०२० च्या तुलनेत सप्टेंबर २०२१ मध्ये १४४ टक्क्यांची वाढ झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलन ३७७ कोटी रुपये झाले आह. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा ३६८ कोटी रुपये होते.
दिल्लीतील जीएसटी संकलन ३६०५ कोटी रुपये राहिले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ते ३१४६ कोटी होते. उत्तर प्रदेशमधून जीएसटीतून ५६९२ कोटींचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा ५०७५ कोटी रुपये होता.
बिहारमध्ये सप्टेंबर महिन्यात जीएसटी संकलन घटून ८७६ कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ते ९९६ कोटी रुपये होते. महाराष्ट्रात सर्वाधिक जीएसटी संकलन झाले आहे. सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात १६,५८४ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. गेल्या वर्षी हा आकडा १३,५४६ कोटी रुपये होता.

Check Also

१८ ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने विमाने घेणार उड्डाण बुकींग मर्यादा काढून टाकली

मुंबई: प्रतिनिधी विमान कंपन्या आणि देशांतर्गत विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने विमान कंपन्यांना १८ ऑक्टोबरपासून सर्व जागांसाठी तिकीट बुक करण्याची परवानगी दिली आहे. कोविड रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे फ्लाइटवरील क्षमता मर्यादा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विमानभाडे कमी होण्याची शक्यता आहे. हवाईवाहतूक मंत्रालयाने विमान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *