Breaking News

काही तासात विकलं ८.१ टन सोनं, जाणून घ्या कारण सोन्याच्या दरातील घसरण हे एक कारण

मुंबई : प्रतिनिधी

भारतासहीत जगभरातील शेअर बाजारात सध्या मोठी तेजी आहे. सेन्सेक्स, निफ्टी  तर रोज विक्रमी वाढ नोंदवत आहेत. शेअर बाजारात आणखी तेजी राहण्याचा अंदाज आहे. यामुळे गुंतवणुकदारांनी आपल्या गुंतवणुकीचा रोख आता शेअर बाजाराकडं वळवला आहे. एकीकडे शेअर्सचे भाव वाढत असताना सोन्याचे भाव मात्र घटत आहे.  शेअर बाजारातील तेजीचा लाभ घेण्यसाठी जगभरातील गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक काढून शेअर्समध्ये पैसे गुंतवत आहेत. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून सोन्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरत आहेत. शुक्रवारी जगातील सर्वात मोठ्या एक्सचेंज ट्रेडेड फंड ने खुल्या बाजारा ८ टनांपेक्षा जास्त सोनं विकलं. एका वर्षातील सोन्याची ही सर्वात मोठी विक्री आहे.

जगभरातील गुंतवणूकदार सध्या सोन्यात गुंतवणूक करणं टाळत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. शेअर बाजारात सध्या विक्रमी तेजी आहे. सोन्यातील गुंतवणूक घटत असल्याने पुढील काही महिने सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता फारच कमी आहे. मोठ्या ब्रोकरेज हाऊसनेही सोन्याच्या लक्ष्याबाबत त्यांचे अंदाज बदलले आहेत.

जगातील सर्वात मोठ्या ईटीएफ एसपीडीआर होल्डिंग्ज ने शुक्रवारी ८.१ टन सोनं विकलं असल्याचं वृत्तसंस्था रॉयटर्सने सांगितलं आहे. या वर्षातील एका दिवसातील सोन्याची ही सर्वाधिक विक्री आहे. या विक्रीनंतर एसपीडीआरकडील सोन्याचा साठा १०००.७९ टनांवरून ९९२.६५ टनांवर आला आहे.

याबाबत तज्ज्ञांनी म्हटलं की,  एसपीडीआर सध्याच्या स्तरावर नफा बुक करत आहे. शेअर बाजारातील परताव्यामुळे सोन्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतींत आणखी वाढ होण्याची शक्यता कमी आहे. या पार्श्वभूमीवर नुकतंच रत्ने आणि दागिने उद्योगात U-Gov Bomnibus द्वारे एक सर्वेक्षण करण्यात आलं. पुढील तीन महिन्यांत सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत वाढ होण्याची अपेक्षा या उद्योगाला असल्याचं सर्वेक्षण सांगण्यात आलं आहे. तीन महिन्यांत शहरांमधील नागरिकांकडून सोन्याची मागणी २८ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज सर्वेक्षणात वर्तवण्यात आला.

देशात १७ ते २० ऑगस्ट दरम्यान करण्यात आलेल्या या ऑनलाइन सर्वेक्षणात २०२१ लोकांची मतं घेण्यात आली. सर्वेक्षणातील पाचपैकी तीन लोकांनी आपल्या कुटुंबासाठी सोनं खरेदी करणार असल्याचं सांगितलं. दिवाळी आणि सणासुदीला सोने खरेदीसाठी सर्वोत्तम काळ असल्याचं ६९ टक्के लोकांनी म्हटलं आहे.

कोविड निर्बंधांमुळे घटलेली सोन्याची मागणी जानेवारी-मार्चमध्ये पुन्हा वाढण्याचा अंदाज रत्ने आणि दागिने उद्योगाने वर्तवला होता. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मागणीत फारशी वाढ झाली नाही.

Check Also

भारतीय समभागांचे मुल्य वाढले, १.४ ट्रिलियन हून जास्त अहवालात माहिती उघड

नॉर्वेच्या सरकारी पेन्शन फंड ग्लोबल, $१.४ ट्रिलियन पेक्षा जास्त पोर्टफोलिओ मूल्यासह जगातील सर्वात मोठा सार्वभौम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *