Breaking News

आणि शिवसेनेची शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची परंपरा झाली खंडीत प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी

१९६६ साली शिवसेनेची स्थापना झाल्यापासून जवळपास २५ वर्षाहून अधिक काळ दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर होत आला आहे. मात्र मागील वर्षापासून कोरोनामुळे दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला नाही. मात्र यावर्षी कोरोना बाधितांच्या संख्येत चांगलीच घट आल्याने यंदाच्यावर्षी तरी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु यंदाचा मेळावा ही शिवाजी पार्क ऐवजी तो मांटुगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये होणार असून हा मेळावा ५० उपस्थितीत शिवसैनिकांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी दिली.

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे असेपर्यत एखादा दुसरा अपवाद वगळता सलग दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्कवर शिवसेनेकडून आयोजित करण्यात येत होता. तसेच शिवसेनाप्रमुखांच्या उपस्थितीतच दसरा मेळाव्याला २५ वर्षे पूर्ण होत असताना एकच वक्ता, एकच मैदान आणि एकच शिवसेनाप्रमुख असा प्रचारही करण्यात आला होता. विशेष म्हणजे या दसरा मेळाव्याला दरवर्षी लाखो शिवसैनिक हजर रहात आले आहेत.

मात्र कोरोनामुळे मागील वर्षी कोरोना नियमामुळे शिवसैनिकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेता आला नाही. त्यामुळे यंदाच्या पार्श्वभूमीवर तर होणार की नाही याबाबत उत्सुकता शिवसैनिकांमध्ये लागून राहीली होती. तसेच काही दिवसांपूर्वी खा.संजय राऊत यांनीही दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यात येणार असल्याचा सुतोवाच करण्यात आला होता. परंतु सध्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अनेक अटी व निर्बंधात अनेक गोष्टी सुरु करण्यात आल्या. तरीही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम असल्याचा इशारा केंद्र आणि राज्य सरकारनेही नुकताच दिला. त्यामुळे यावेळी सुतोवाच करूनही यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क घेता येणार नाही.

बाळासाहेब यांचे निधन २०१२ ला निधन झाल्यानंतर जवळपास १० वर्षे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याची परंपरा कायम सुरु ठेवली. शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा कालावधी पाहिला तर जवळपास ३३ ते ३५ वर्षे दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत आला आहे. बाळासाहेबांच्या शेवटच्या वर्षाच्या कालावधीत ऐन निवडणूकांच्या कालावधीत दसरा आल्याने शिवसेनेला आपला दसरा मेळावा बीकेसीतील मैदानावर घ्यावा लागला होता. त्यानंतर मात्र गेल्यावर्षी आलेल्या कोरोनामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची शिवाजी पार्कवरील परंपरा खंडीत झाल्याचे दिसून येत आहे.

Check Also

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसाठी गोड बातमी: मानधनात वाढ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *