Breaking News

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, कोरोनामुळे सर्व निर्बंध जैसे थे नियमात शिथिलता नाहीच

मुंबईः प्रतिनिधी
देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला. देशाच्या तुलनेत राज्यात रुग्णवाढीचा दर कमी असला तरी करोनाचा धोका पाहता राज्यात कोरोना रोखण्यासाठीच्या नियमांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नसून सध्या लागून असलेले निर्बंध यापुढेही कायम लागू राहतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यामुळे व्यापारी आणि प्रवाशांच्या पदरी निराशा पडली आहे.
दुकाने आणि प्रवासाच्या नियमात कोणतेही बदल केले जाणार नसल्याचे स्पष्ट करत राज्यात जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्यावर आमचा भर आहे. राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. उर्वरित २६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि नगरमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
राज्य सरकारने मंगळवारी दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात ७ हजार २४३ नवे करोनाबाधित आढळले आहेत. हा आकडा सोमवारी ७ हजार ६०३ इतका होता. त्यामुळे नव्याने आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागल्याचं दिसून येत आहे. नव्या करोनाबाधितांच्या आकडेवारीनंतर महाराष्ट्रात आजपर्यंत सापडलेल्या एकूण करोनाबाधितांची संख्या आता ६१ लाख ६५ हजार ४०२ इतकी झाली आहे.
केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त लसी या केंद्र सरकारकडून मिळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगत ऑगस्ट महिन्यात ४ कोटी लसी उपलब्ध होतील. सध्या राज्यात होणारा लसींचा पुरवठा हा कमी आहेत. दुसरीकडे लसीचे दोन डोस घेतलेल्यांना आरटीपीसीआर विना राज्यात प्रवेश देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
करोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सेवानिवृत्तीचं वय ६२ पर्यंत वाढवण्यात आले आहे. सेवा निवृत्तीचं वय वाढवण्यास कार्योत्तर मान्यता मंत्रिमंडळानं दिली असून त्याचबरोबर डॉक्टरांची रिक्त जागा भरण्यासाठी पावले उचलली जात आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे राज्यांनी घातलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर लोकं पर्यटनस्थळे आणि बाजारपेठेत मोठी गर्दी करत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन होत नसेल तर तर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारने मंगळवारी दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात ७ हजार २४३ नवे करोनाबाधित आढळले आहेत. हा आकडा सोमवारी ७ हजार ६०३ इतका होता. त्यामुळे नव्याने आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागल्याचं दिसून येत आहे. नव्या करोनाबाधितांच्या आकडेवारीनंतर महाराष्ट्रात आजपर्यंत सापडलेल्या एकूण करोनाबाधितांची संख्या आता ६१ लाख ६५ हजार ४०२ इतकी झाली आहे.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *