Breaking News

सांगोल्यातील शेतकऱ्यांना पवारांचा मदतीचा हात दुष्काळामुळे शिक्षणात अडचणी येत असतील तर मदतीचे शरद पवारांचे आश्वासन

सोलापूर – सांगोला: प्रतिनिधी
दुष्काळामुळे मुलांच्या शिक्षणात अडथळा येत असेल तर मदत करण्याबाबत प्रयत्न करु असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सध्या राज्यातील दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर आहेत. आज सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथील चारा छावण्यांची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
सध्या फक्त पाच जनावरांना छावणीत प्रवेश आहे. सरसकट जनावरांना चारा छावणीत प्रवेश मिळावा, रोज पंधरा किलो चारा मिळतो, जनावरांना अधिक चारा मिळावा अशी विनंती शेतकऱ्यांनी यावेळी त्यांच्याकडे केली.
दुष्काळाआधी दोन हजार लिटर दूध संकलन होत असलेल्या यलमार मंगेवाडी गावात आता दूध संकलन दोनशे लिटरवर आले आहे, अशी भीषण परिस्थिती गावकऱ्यांनी त्यांच्यासमोर मांडली.
यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांकडून दुष्काळी परिस्थिती जाणून घेतली. तसेच गावातील किती मुलं शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत याबाबतची विचारणाही केली.
मात्र दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरसचे आमदार हनुमंत डोळस यांचे निधन झाल्याचे वृत्त कळताच शरद पवार यांनी पुढील दुष्काळी दौरा रद्द केला.

Check Also

अमित शाह यांची घोषणा, सत्तेवर येताच संपूर्ण देशात समान नागरी कायदा

संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाच वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका, ७० वर्षावरील प्रत्येक नागरीकास पाच लाखापर्यंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *