Breaking News

आम्हाला चर्चा नको…आधी मदत जाहीर करा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची विधान परिषदेत मागणी

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या हाताला काम नाही…हातचं पीक गेलं…शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा सवाल करतानाच शेतकरी आपले सरण रचून आत्महत्या करत आहेत… धनगरांनाही आरक्षण मिळत नाही…आम्हाला सभागृहात चर्चा नकोय…आधी मदत जाहीर करावी आणि मराठा आरक्षण पटलावर आणावे अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली मात्र हा स्थगन प्रस्ताव सभापतींनी फेटाळला त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण होवून सभागृहाचे कामकाज अर्धा तासासाठी तहकुब करण्यात आले.

धनंजय मुंडे यांनी १९७२ पेक्षा भयानक असा राज्यात दुष्काळ पडल्याचे सांगतानाच सरकारने दुष्काळ जाहीर करुन २२ दिवस उलटले तरी शेतकऱ्यांना मदत किंवा टॅंकर दिले जात नाहीय. दुष्काळाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अशावेळी हा नियम २८९ चा मुद्दा होत नाही का असा सवाल करतानाच १९७२ च्या दुष्काळाऐवजी २०१८-१९ मधील या भयंकर दुष्काळाची इतिहासामध्ये नोंद होणार असल्याचे स्पष्ट केले.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना १ लाख हेक्टरी जाहीर करा आणि दुष्काळी भागातील विदयार्थ्यांची फी माफ करावी अशी मागणी यावेळी केली. दुष्काळ आणि आरक्षणाचा प्रश्न मांडत असताना सभापतींनी हा स्थगन प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे सभागृहामध्ये गोंधळ निर्माण झाल्याने सभागृहाचे कामकाज तहकुब करण्यात आले. त्यानंतरही सभागृहाचे कामकाज सुरु झाले मात्र पुन्हा सभागृहामध्ये गोंधळ निर्माण झाल्याने पुन्हा एकदा अर्धा तासासाठी कामकाज तहकुब करण्यात आले.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *