Breaking News

डॉ.तडवीच्या आत्महत्येने झोपलेले डॉक्टर कोलकात्यातील मारहाणीने जागे झाले कोलकाता येथील डॉक्टरच्या मारहाणीचा निषेधार्थ मार्डचे डॉक्टर संपावर

मुंबईः प्रतिनिधी
नायर हॉस्पीटल येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय डॉ. पायल तडवीचा तिच्या जातीवरून बोलल्याने आत्महत्या करावी लागली. या आत्महत्येच्या घटनेवर झोपलेल्या डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने झोपेचे सोंग घेतले. मात्र कोलकाता येथील एका डॉक्टरला मारहाण केल्याच्या निषेधार्थ राज्यातील याच संघटनेने एकदिवसीय संपाचे हत्यार उपसल्याने डॉक्टरांच्या सामाजिक जाणीवेबद्दल उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे.
कोलकाता येथील ज्युनिअर डॉक्टरला रूग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवण्यासाठी राज्यातली प्रत्येक शासकीय रूग्णालयातले मार्डचे डॉक्टर सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या दरम्यान हे डॉक्टर संपावर गेले. या दरम्यान कोणतीही अत्यावशक सेवा बाधित होणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं. फक्त महाराष्ट्रातच नाही तर छत्तीसगढ, दिल्ली या ठिकाणचेही निवासी डॉक्टरही संपावर गेले.
एकाबाजूला डॉक्टरांवरील होणारे सततचे हल्ले आणि त्यांची सुरक्षितता याप्रश्नांवरून मार्ड संघटनेने नेहमीच टोकाचे पाऊल उचलले आहे. परंतु याच डॉक्टरांच्या संघटनेने विशेषतः मुंबई सारख्या शहरातील नायर रूग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थीनीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या कारणावर काहीही बोलायला तयार नाही की त्याचा साधा निषेधही करायला तयार नाही. त्यामुळे एकाबाजूला मानव सेवा हीच ईश सेवा म्हणणाऱ्या डॉक्टरांच्या याच उपटसुंभ वागणूकीबाबत समाजात आर्श्चय व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

गायक-कवी वामनदादा कर्डक होते कसे ? अल्प जीवन परिचय वाचा मुलाच्या लेखणीतून त्यांच्याबाबत लिहित आहेत त्यांचे सुपुत्र रविंद्र कर्डक

युगकवि वामनदादा कर्डक यांचा जन्म देशवंडी तानाजी.सिन्नर जि.नाशिक येथे १५ ऑगस्ट १९२२ रोजी झाला. वामनदादा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *