Breaking News

नांदेड माळेगाव येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळा विटंबनप्रकरणी एकास अटक मनोरूग्ण असल्याचे पोलिसांचे म्हणणे

नांदेड: प्रतिनिधी

येथील माळेगांव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार काल सकाळी उघडकीस आला. त्यानंतर आंबेडकरी कार्यकर्त्यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करत संबधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर पोलिसांनी तातडीने हालचाल करत गावातीलच तरूण आरोपी सचिन गायकवाड यास अटक केली.

हा सचिन गायकवाड हा मनोरूग्ण असून त्याने यापूर्वी गावातील एका मंदीरातील देवाची मूर्तीही फेकून दिली होती अशी माहिती पोलिसांनी दिली. गायकवाड याने परवा रात्री ३ वाजता डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली. ही बाब सकाळी नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने पोलिसांना कळवित यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केल्याची माहिती भीम आर्मीचे अशोक व्यावले यांनी सांगितले.

सदर पुतळा विटंबनेप्रकरणी आरोपीच्या विरोधात कलम२९५ आणि ४२७ अन्वयेखाली गुन्हा नोंदवविण्यात आला असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माळेगाव येथील डॉ. बाबसाहेब आंबेडकर पुतळा प्रकरणात एका मनोरुग्ण आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच  भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अशोकभाऊ वायवळे व आजाद समाज पार्टी चे नेते, राहुल भाऊ प्रधान यांनी आरोपीच्या पाठीमागे डोके कोणाचे आहे याचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी पोलीस अधीक्षक, नांदेड यांना सूचना केली व विटंबना झालेला पुतळा काढून तेथे पंचधातूचा पुतळा बसवण्यात यावा व पुतळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात यावे अशा प्रमुख दोन मागण्या ,जिल्हाधिकारी, नांदेड यांच्याकडे केल्या आहेत तसेच या दोन्ही मागण्या मान्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहात अशाच एकाने घुसून तेथील झाडांची आणि कुड्यांची नासधुस केल्याची घटना नुकतीच घडली. त्यावेळीही अटक करण्यात आलेला हल्लेखोर हा मनोरूग्ण असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे डॉ.आंबेडकर यांच्या पुतळा आणि घराच्या नासधुसप्रकरणी मनोरूग्णच कसे आढळून येतात असा सवाल आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Check Also

ब्रम्हपूरीत रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीचा रणसंग्राम राज्यभरातील ६०० महिला कुस्ती पटुंचा सहभाग; लाखोंची बक्षीसे

ब्रम्हपूरी शहराला शिक्षण व आरोग्य विषयक सोयींसाठी अवघ्या विदर्भात नावलौकिक प्राप्त आहे. मात्र ह्याच शहरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *