Breaking News

पुढील काही दिवसांत इंदू मिल येथे डॉ.आंबेडकर स्मारकाचा पायाभरणी समारंभ राजकारण करू नये असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी

इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. त्यामुळे या स्मारकाच्या पायाभरणीचा समारंभ पुढील काही दिवसात सर्वांच्या सहकार्याने पार पाडणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली. मात्र याचे राजकारण करून नका असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

एमएमआरडीएने देखील राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले मात्र अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे. हे मी लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा असे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे कुणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Check Also

लेकाच्या अभियानात बापाने उचलला खारीचा वाटा जयंत पाटील यांनी उचलला दहा जणांच्या लसीचा खर्च

सांगली: प्रतिनिधी आज सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लसीचा पहिला डोस घेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *