Breaking News

न्यायालयाचा निर्णय: आरोपी देणार मृतकाच्या वारसाला ११ लाखाची नुकसान भरपाई दिंडोशी न्यायालयाचा निकाल

मुंबई: विशेष प्रतिनिधी

कांदिवली येथील एका खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षेबरोबर ११ लाख रूपयांचा दंड ठोठावला असून ही दंडाची रक्कम खून झालेल्या व्यक्तीच्या पत्नीला देण्याचा निर्णय दिंडोशी न्यायालयाने दिला. दिंडोशी न्यायालयाने दिलेला निकाल आतापर्यतच्या न्यायालयांपेक्षा वेगळा आहे.

कांदिवली येथी रहिवाशी स्व.कपूरचंद गुप्ता आणि खून प्रकरणातील आरोपी शिवप्रसाद बालगोविंद केसरी उर्फ शिवा याच्याबरोबर फेरीवाल्यांकडून दिलेल्या कर्जावर वारेमाप व्याज वसुलीवरून शत्रुत्व आणि व्यवसायासाठी लागणाऱ्या मोकळ्या जागेवरून शत्रुत्व होते.  २० डिसेंबर २०१२ रोजी रात्री कपूरचंद गुप्ता हे आपले काम संपवून घरी जाताना मध्येच शिवप्रसाद बाल गोविंद केसरी उर्फ शिवा आणि त्याचा साथीदार शिवकुमार पथरू भारद्वाज हे सात आठ जणांच्या टोळीने गाडीने पाठलाग केला. एलबीएस रोडवर आरोपींनी गुप्ता यांच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली. गुप्ता खाली पडताच शिवप्रसादने चाकूसह गाडीतून उतरून त्यांना चाकूने भोसकायला सुरुवात केली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपींनी पलायन केले. दरम्यान गुप्ता यांचे मित्र आणि शेजारी गौड पिता-पुत्रांनी त्यांना रूग्णालयात दाखल करून सदर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. सदर आरोपींना नाशिक येथून अटक केली.

याप्रकरणी ७ डिसेंबर २०२० रोजी अंतिम निकाल दिंडोशी न्यायालयाने देताना सदर आरोपी शिवप्रसाद ला १० लाख रूपयांचा दंड ठोठावत जन्मठेपेची शिक्षा सुणावली. तर त्याचा साथीदार शिवकुमारला १ लाखाच्या दंडाबरोबर जन्मठेपेची शिक्षा सुणावली असून दंडाची रंक्कम न भरल्यास आणखी तीन वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

विशेष म्हणजे न्यायालयाने दंडापोटी ठोठावलेली रक्कम स्व.कपुरचंद गुप्ता यांच्या पत्नी सुशिलादेवी कपूरचंद गुप्ता यांना देण्याचा निर्णय दिला. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेतील हा सर्वात मोठा निर्णय असल्याचे मत कांदीवली परिसरातील नागरीकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

मुंबईकरांनो सावधान ! कोरोनाचे हे नियम मोडाल तर होणार गुन्हा दाखल महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांचे सक्‍त आदेश

मुंबई : प्रतिनिधी कोविड-१९ विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असतानाच मागील काही दिवसांत रुग्‍ण संख्‍या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *