Breaking News

धुळे महापालिकेत सत्ता भाजपकडे तर अ.नगरमध्ये युतीकडे जाण्याची शक्यता सर्वाधिक जागा भाजपला तर सर्वाधिक कमी काँग्रेसला जागा मिळाल्या

मुंबई : प्रतिनिधी

धुळे महानगरपालिकेच्या निवडणूकीत डावलले जात असल्याच्या कारणाने भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आपल्याच पक्षाच्या विरोधात दंड थोपटले. त्यामुळे धुळे महापालिकेवर भाजपची सत्ता येण्यास अडचण होणार असल्याची अटकळ बांधली जात होती. परंतु जलसंपदा मंत्री गिरिष महाजन, रोहयो मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली धुळे महापालिकेत तब्बल ५० जागा जिंकत भाजपने विजय मिळविला. तर अहमदनगर महानगरपालिकेत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिकल्या असल्याने भाजप-सेना एकत्र आले तर युतीची सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे.

या निवडणूकीत ७४ जागांपैकी भाजपने सर्वाधिक ५० जागा मिळवित एकहाती सत्ता मिळविली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ८, काँग्रेसला ६ आणि बहुजन समाज पार्टी आणि शिवसेनेला प्रत्येकी १ जागा मिळाली आहे. तर एमआयएमला ४ आणि समाजवादी पार्टीला २ जागा मिळाल्या असून लोकसंग्राम पक्ष १ ठिकाणी जिंकून आला आहे.

तर अहमदनगर महापालिका निवडणूकीत ६८ जागांपैकी सर्वाधिक २४ जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ ठिकाणी उमेदवार निवडून आले आहेत. तर १४ ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर अ.नगरमध्ये युतीची सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे मात्र अवघ्या ५ ठिकाणी उमेदवार निवडून आले आहेत. बसपाचे ४ उमेदवार जिंकून आले आहेत.

त्यामुळे या दोन्ही महापालिकांच्या निवडणूकीत केवळ ११ जागा जिंकता आल्या आहेत.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *