Breaking News

स्व. प्रतापसिंह मोहिते पाटलांचे सुपुत्र लवकरच काँग्रेसमध्ये धवलसिंह मोहिते-पाटील यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष थोरातांची भेट

मुंबईः प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याचे माजी खासदार स्व.प्रतापसिंह मोहिते- पाटील यांचे चिरंजीव डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली असून ते लवकरच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले.
सोलापूरच्या राजकारणात स्व.प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे एक स्वतंत्र स्थान होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचा राजकिय वारसा त्यांचे सुपुत्र डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे हस्तांतरीत झाला. मध्यंतरी त्यांच्याकडे अकलूजच्या सरपंच पदाची जबाबदारी होती. आता त्यांना राज्याच्या राजकारणात झेप घेणार असल्याचे बोलले जात आहे.
धवलसिंह मोहिते-पाटील यांचे काका विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपासून लांब झाले आहेत. तसेच त्यांचे बंधु रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपात प्रवेश करत आमदारकी मिळविली आहे. त्यामुळे धवलसिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

Check Also

कोकण-पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने दिला दिलासा पुन्हा होणार JEE-Main ची परिक्षा-शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूर आणि दरड  कोसळण्याच्या घटना घडल्या. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *