Breaking News

धारावीसह इतर पायाभूत प्रकल्पांना आता थेट दुबईतून मदत मिळणार दुबईतील एमबीएम समुहाच्या प्रमुखाशी मुख्यमंत्र्यांची चर्चा

 दुबई-  मुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील धारावी पुर्नवसन प्रकल्पासह अनेक मोठ्या प्रकल्पांना भारतीय अर्थात मुंबईतील गुंतवणूकदारांकडून आणि सरकारी बँकांकडून गुंतवणूकीस अप्रत्यक्ष नकार दिला. त्यामुळे या अर्धवट तर काही प्रकल्प सुरुच होवू शकले नसलेल्या प्रकल्पांना आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या परदेशी दौऱ्यावर असून या प्रकल्पांसाठी दुबईतील प्रसिद्ध एमबीएम समुहाने मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चे दरम्यान सहकार्य करण्याची तयारी दाखविली. त्यामुळे या प्रकल्पांना थेट आता दुबईतून मदत मिळणार आहे.

दुबईतून  मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासह राज्यातील विविध नागरी पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये महाराष्ट्राला सहकार्य करण्यास सहमती दाखवली आहे. तर डीपी वर्ल्ड समुहाने मल्टिमॉडल लॉजिस्टिक पार्कच्या उभारणीत आणि थुम्बे समुहाने आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांमध्ये सहयोग देण्याची तयारी दाखवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल (दि.9)  दुबईत या तिन्ही समुहांशी यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याचे शिष्टमंडळ काल शनिवारी  (दि. 9)  कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले. या दौऱ्यात अनेक संस्था, कंपन्यांशी ते संवाद साधणार असून, त्यातून राज्यातील कृषी विकास, पायाभूत सुविधा उभारणी आणि राज्याच्या विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या माहिती-तंत्रज्ञानआधारित उपक्रमांना गती देणार आहेत.

या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल दुबई येथे नेतृत्वाखाली या शिष्टमंडळाचे दुबईत आगमन झाले. भारतीय राजदूत नवदीप सुरी यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची डीपी वर्ल्डचे समूह अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुलतान अहमद बिन सुलायेम यांच्याशी चर्चा झाली. कॉर्पोरेट व्यवहार उपाध्यक्ष अनिल मोहता आणि महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. डीपी वर्ल्डने राज्य  सरकारसोबत मल्टिमॉडल लॉजिस्टिक पार्कच्या उभारणीत योगदान देण्याची तयारी दर्शविली. विशेषत: नागपुरात काम करण्यास हा समूह उत्सूक आहे. डीपी वर्ल्ड ही जगातील आघाडीची कंपनी राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधीमध्ये (एनआयआयएफ) भागिदार असलेली कंपनी आहे.

एमबीएम समुहाचे चेअरमन शेख मोहम्मद बिन जुमा अल मक्तुम यांच्याशीही मुख्यमंत्र्यांची सायंकाळी भेट झाली. मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासह राज्यातील विविध नागरी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी सहकार्य करण्याविषयी शेख मोहम्मद बिन जुमा अल मक्तुम यांनी या भेटीत  सहमती दाखवली.

थुम्बे समूहाचे संस्थापक अध्यक्ष थुम्बे मोईदीन यांनी सायंकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्र सरकारसोबत आरोग्यसुविधा क्षेत्रात काम करण्याची तसेच यासंदर्भात सामंजस्य करार करण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली आहे. मध्यपूर्वेतील प्रभावशाली १०० कंपन्यांच्या यादीत थुम्बेचा समावेश असून, विविध १३ क्षेत्रात हा समुह कार्यरत  आहे. सुमारे ८० राष्ट्रांतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन या कंपनीचा शिक्षण आणि आरोग्यक्षेत्रात प्रवास सुरू आहे.

Check Also

ओला कॅबचा आयपीओ लवकरच बाजारात ५०० लाखाचा निधी उभारण्यासाठी महिनाभरात आणणार

SoftBank अर्थसहाय्याने प्रणित ओला कॅब Ola Cabs पुढील तीन महिन्यांत $५०० दशलक्ष उभारण्यासाठी प्रारंभिक सार्वजनिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *