Breaking News

धनंजय मुंडेच्या “रसिक”तेवर…विनायक मेटेंची टीका तर गृहमंत्र्यांचे मोघम उत्तर सपना चौधरीच्या नाच गाण्याचा कार्यक्रम केला आयोजित

मुंबई: प्रतिनिधी

आपल्या “रसिक”तेपणामुळे आधीच राज्यात चर्चेत आलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिवाळी निमित्त परळीत प्रसिध्द डान्सर सपना चौधरी यांच्या नाच गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला. विशेष म्हणजे राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप, नुकतेच अहमदनगरमध्ये रूग्णालयाला आग लागून झालेल्या दुर्घटनेत ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू आणि शेतकऱ्यांना पुरेशी नुकसान भरपाईवरून विरोधकांकडून सातत्याने टीका करण्यात येत असताना त्यांनी दाखविलेल्या “रसिक”तेमुळे शिवसंग्राम संघटनेचे नेते तथा आमदार विनायक मेटे यांनी मंत्री मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवित महाविकास आघाडीच्या मंत्र्याना हे शोभत का? असा सवाल केला.

परळीत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सपना चौधरीचा नाचगाण्याचा कार्यक्रम ठेवला. कालच अहमदनगरमध्ये ११ लोकांचा होरपळून मृत्यू झाला आणि तो देखील सरकारी रूग्णालयात झाला. त्याचं एवढं मोठं सावट असताना, शेतकऱ्याला आजही नुकसान भरपाई मिळाले नाही, त्यामुळे त्यांची काळी दिवाळी साजरी आणि उपाशी पोटी दिवाळी साजरी होत असताना हे इथे सपना चौधरीला ठुमके लावायला लावत आहेत.

एसटी कामगार घरदार सोडून आपल्या हक्कासाठी धरणे आंदोलन व आक्रोश करतोय. त्या प्रश्नामध्ये लक्ष घालायचं, तर हे सपना चौधरीला आणून ठुमके लावायला लावत आहेत. सामाजिक न्यायमंत्र्यांनी सामाजिक भान राखणं अत्यंत आवश्यक असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी धनंजय मुंडे यांना लगावला.

बीड जिल्ह्यात आज खूप मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्याचा कधीतरी आढावा जर पालकमंत्र्यांनी घेतला तर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचार, अवैध धंदे, जमिनी हडप करण्याचे प्रकार जर थोडं जरी लक्ष घातलं. तर मला वाटतं ते सामाजिक न्याय या खात्याला न्याय देण्यासारखं काम त्यांच्याकडून होईल. धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते असताना जेवढं सामाजिक भान ठेवून ते काम करत होते, ते त्यांचं सामाजिक भान कुठं हरपलंय? असा आमच्या सारख्यांना नक्कीच प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.

यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संपर्क साधला असता त्यांनी असं व्हायला नको होतं अशी मोघम प्रतिक्रिया व्यक्त केली.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *