Breaking News

फडणवीस, दरेकरांचा दौरा पवारांच्या एका बालेकिल्ल्यातून सुरु होवून दुसऱ्यात संपणार दौऱ्याची सुरुवात बारामतीतून तर शेवट साताऱ्यात

मुंबई: प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणात भाजपा आणि महाविकास आघाडी विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा विरूध्द शरद पवार विरूध्द भाजपा नेते देवेंद्र फडणवीस असा सामना रंगला पाह्यला मिळत आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील नेते प्रविण दरेकर हे जोडीने जाणार आहे. मात्र या दौऱ्याची सुरुवात शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीतून सुरु होणार असून दुसरा बालेकिल्ला असलेला सातारा जिल्ह्यात या दौऱ्याची सांगता होणार आहे.

खोट वाटत  असेल तर त्यांच्या दौऱ्याची नियोजन पहा…

पुणे, सोलपूर, सांगली व सातारा जिल्हयाचा अतिवृष्टी दौरा

सोमवार , दिनांक  19 ऑक्टोबर,2020 (पुणे व सोलापूर जिल्हा)

09.15 वा.          VT-PSB या विमानाने मा. देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधान सभा तथा माजी मुख्यमंत्री यांच्या समवेत बारामती, जि. पुणे कडे प्रयाण

10.00 ते   02.00 वा        बारामती विमानतळ, जि. पुणे येथे आगमन व मा. देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधान सभा तथा माजी मुख्यमंत्री यांच्या समवेत दौंड तालुक्यातील कुरकुंभ, मळदगांव, रावणगांव, खडकी, स्वामी चिंचोली, इंदापूर तालुक्यातील इंदापूर, संसर, निमगांव केतकी व माढा तालुक्यातील टाकळी, गारअकोले येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी.

02.00 वा.          टेंभुर्णी, ता. माढा येथे राखीव

03.00 वा           टेंभुर्णी, ता.माढा येथून भंडीशेवगाव, ता. पंढरपूर कडे शासकीय वाहनाने प्रयाण

सायं.     04.00 वा.          भंडीशेवगाव, ता.पंढरपूर येथे आगमन व तेथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी

04.30 वा.          भंडीशेवगाव येथून कुंभारघाट कडे शासकीय वाहनाने प्रयाण.

05.00 वा.          कुंभारघाट येथे आगमन व कुंभारघाटाजवळील भिंत कोसळून झालेल्या अपघातस्थळी पहाणी व अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकांची सात्वंनपर भेट

07.00 वा.          पंढरपूर येथून सोलापूर कडे शासकीय वाहनाने प्रयाण

रात्रौ      08.00 वा.          शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन, राखीव व मुक्काम

 

…………………………………………………………..

मंगळवार, दिनांक  20 ऑक्टोबर,2020 (सोलापूर व सांगली जिल्हा)

सकाळी  08.00 वा           शासकीय ‍विश्रामगृह, सोलापूर येथून अक्कलकोट कडे शासकीय वाहनाने प्रयाण

10.00 वा           संगोगी (ब), ता. अक्कलकोट येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी

10.30 वा.          अंधेवाडीज, ता. अक्कलकोट येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी

11.00 वा.          अंधेवाडीज येथून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शासकीय वाहनाने प्रयाण

दुपारी    12. 00 वा          सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व जिल्हाधिकारी/कृषी अधीक्षक यांचे समवेत चर्चा

स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर

12.30 वा.          पत्रकार परिषद

स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर

01.00 वा.          शासकीय विश्रीमगृह, सोलापूर येथे राखीव

02.00 वा.          सोलापूर येथून जत जि. सांगलीकडे शासकीय वाहनाने प्रयाण

03.30 वा.          उमदी, ता. जत येथे आगमन व तेथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी

सायं.     04.30 वा           बाळेवाडी, ता.आटपाडी येथे आगमन व तेथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी

05.00 वा.          आटपाडी येथून झरेगाव कडे शासकीय वाहनाने प्रयाण

05.30 वा.          झरेगाव येथे आगमन, राखीव व मुक्काम

………………………………………………………………………

बुधवार, दिनांक  21 ऑक्टोबर,2020 (सांगली व सातारा जिल्हा)

सकाळी  09.00 वा           झरेगाव येथून शासकीय वाहनाने प्रयाण व अनुझेमळा, माडगुळे, लेंगरेवाडी, तडवले, करगणी, बनपूरी, मिटकी तलाव,  करंजे येथे भेट

दुपारी    12.00 वा           करंजे येथून खानापूर मार्गे पेड, ता.तासगाव, जि.सांगली कडे शासकीय वाहनाने प्रयाण

12.30 वा.          पेड, ता. तासगाव येथे आगमन पेड, कत्तेएकंद येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी.

01.00 वा           माधवनगर शासकीय विश्रामगृह, सांगली येथे आगमन व राखीव

03.00 वा           जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व जिल्हाधिकारी/कृषी अधीक्षक यांचे समवेत चर्चा

स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली

  1. 30 वा पत्रकार परिषद

स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली

सायं.     04.00 वा           सांगली येथून इस्लामपूर कडे शासकीय वाहनाने प्रयाण

06.00 वा           इस्लामपूर येथून सातारा कडे शासकीय वाहनाने प्रयाण

07.00 वा           शासकीय विश्रामगृह, सातारा येथे आगमन, राखीव मुक्काम

…………………………………………………………………………

गुरूवार, दिनांक  22 ऑक्टोबर,2020 (सातारा जिल्हा)

सकाळी  08.30 वा.          सातारा विश्रामगृह येथून ता. जावळी  कडे शासकीय वाहनाने प्रयाण

09.00 वा.           जावळी येथे आगमन व रिटकवली येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी

10.00 वा           सातारा ग्रामीण येथे आगमन व कारीव, गाजवडी येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी

11.30 वा.          जिल्हाधिकारी सातारा येथे आगमन व जिल्हाधिकारी/कृषी अधीक्षक यांचे समवेत चर्चा

स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा

दुपारी    12.30 वा.          पत्रकार परिषद

स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा

01.00 वा.          सातारा शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव

02.00 वा.          सातारा शासकीय विश्रामगृह येथून वाई ग्रामीण कडे शासकीय वाहनाने प्रयाण

03.00 वा.          वाई ग्रामीण येथे जि. सातारा येथे आगमन व चिखली व मालतपूर येथील  अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी

सायं.     04.00 वा.          महाबळेश्वर ग्रामीण, जि. सातारा येथे आगमन व आब्रळ ,राजपुरी येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी.

 

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *