Breaking News

देवेंद्र फडणवीस यांच्या सात महिन्यातील कार्यकर्तृत्वाला असाही उजाळा ‘जनसेवक’ विशेषांकाचे प्रकाशन

मुंबई : प्रतिनिधी

कोरोनाच्या कठीण प्रसंगी कोविड सेंटरला दिलेल्या भेटी तसेच निसर्ग चक्रिवादळाची परिस्थिती असो वा महाराष्ट्रातील अतिवृष्टीचे प्रसंग पण प्रत्येक संकटाच्या काळात केवळ स्वस्थ बसून न राहता जनतेमध्ये प्रत्यक्ष फिरून व त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम कोविड योध्दे देवेंद्र फडणवीस यांनी ख-या अर्थाने केले. देवेंद्रजी यांनी केलेल्या या सामाजिक कार्याची नोंद घेऊन प्रकाशित करण्यात आलेले ‘जनसेवक’ हा विशेषांक पुढच्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी व दिशादर्शक ठरेल असा ठाम विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज व्यक्त केला.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देणारे तसेच कोरोनोच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या सेवाकार्याचा समावेश असलेल्या ‘जनसेवक‘ या विशेषांकाचे प्रकाशन आज विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते व भाजपा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तसेच जनसेवक विशेषांकाचे अतिथी संपादक माधव भांडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. याप्रसंगी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ, हिन्दुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, भाजपाचे मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक, दिपाली मोकाशी, रविंद्र गोळे आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात विवेक साप्ताहिक प्रकाशित ‘जनसेवक‘ विशेषांक सोहळा पार पडला.

विवेक साप्ताहिकाने या विशेषांकाच्या माध्यमातून आदर्श उपक्रम रावबिला आहे. त्यांनी एका चांगल्या विशेषांकाचे प्रकाशन केले असे सांगतानाच दरेकर म्हणाले की, विवेकने प्रकाशित केलेला हा विशेषांक म्हणजे प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यासाठी  संग्रही ठेवा  आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना सारख्या कठिण प्रसंगी राज्य सरकारची यंत्रणा सर्वच स्तरावर अपयशी ठरत असताना देवेंद्रजी यांनी कोविड सेंटरचा दौरा केला. ज्यावेळी राज्य सरकारची यंत्रणा कुचकामी ठरत होते व प्रशासनाचे प्रमुख घरी बसले होते. तेव्हा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संकटात सापडलेल्या जनतेला धीर दिला. मग फक्त कोरोनाचा काळ नव्हे तर त्यानंतर आलेले निसर्ग चक्रिवादळ तसेच राज्यातील अतिवृष्टी या संकटसमयी ते प्रत्यक्ष घटनास्थळी गेले. आपण स्वत: या सर्व घटनांचे साक्षीदार आहोत. कारण या प्रत्येक ठिकाणी आपण त्यांच्यासमेवत सामाजिक कार्य करीत होतो. त्यामुळे या सर्व काळात त्यांनी अविरत परिश्रम केले. राज्यातील जनतेला धीर दिला व त्यांच्या या सामाजिक कार्याची नोंद विवेक या साप्ताहिकाने घेतली व एका अर्थाने जनतेच्यावतीने त्यांच्या योगादनाप्रति कृतज्ञता व्यक्त केली असे आपले मत असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणून गेली पाच वर्षे दिवस रात्र राज्यातील जनेतेची सेवा देवेंद्रजी यांनी केलीच, पण विरोधी पक्ष नेता या नात्याने त्यांनी वेळ प्रसंगी आपला जीव धोक्यात टाकून जनसेवेचे कार्य केले त्यामुळे जनतेने फडणवीस यांना जनसेवक हा किताब दिल्याचे उद्गार देरकर यांनी काढले.

देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिमत्व हे नेहमीच विवेकशील व संयमी राहिले आहे, त्यामुळे विवेक साप्ताहिकाने देवेंद्रजी यांच्यावर विशेषांक प्रकाशित करणे हा सुध्दा एक योगायोग आहे असे सांगतानच दरेकर म्हणाले की, विवेक चा उपक्रम अतिशय आदर्श असा आहे. त्यांनी प्रकाशित केलेला पुस्तरुपी ठेवा संग्रही ठेवण्यासारखा आहेच, पण ख-या अर्थाने पुढच्या युवा पिढीला प्रेरणादायी व दिशादर्शक असा आहे असेही त्यांनी सांगितले.

देवेंद्रजी यांनी एमएमआरडीए रिजन, महाराष्ट्रातील सर्वच भाग या कठिण काळात पालथा घातला. त्यातच पक्षाने त्यांच्याकडे बिहार विधानसभा निवडणूकीची जबाबदारी सोपविली, तेथेही त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केली, पण अखेर त्यांना कोरोनाने गाठले असे सांगतानाच दरेकर म्हणाले की, अन्य राजकीय नेते कोरोना झाल्यावर पंचातारांकित रुग्णालयात उपचार घेत असतानाच फडणवीस यांनी सेंट जॉर्ज या सरकारील रुग्णालयात उपचार घेणे पसंत केले. एका प्रकारे त्यांनी सरकारी यंत्रणेवर विश्वास दाखविला असेही त्यांनी सांगितले.

Check Also

चंद्रकांत पाटलांची शिवसेनेला पिंजऱ्यातील वाघाची उपमा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

पुणे: प्रतिनिधी आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *