Breaking News

“…येथे येर गबाळ्याचे काम नाही” म्हणत फडणवीसांचा चौफेर हल्ला राज्य सरकारचे काढले वाभाडे

मुंबईः विशेष प्रतिनिधी

राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चौफेर हल्ला चढवित कोरोना काळातील भष्ट्राचार, राज्यपालांना देण्यात येत असलेली वागणूक, राज्यातील कायदा व सुव्यवस्था आदी प्रश्नांसह विविध प्रश्नांवर चोहोबाजूने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेरत चौफेर हल्ला चढवित सत्तेच्या येथे येरा गबाळ्याचे काम नाही असे सांगत राज्य चालविण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी त्यांनी ठेवला.

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या ठरावावरील चर्चेवेळी ते बोलत होते.

काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना प्रवासासाठी बोर्डींग पास जारी करण्यात आला. शासकिय विमानात इंधन भरण्याची परवानगी देण्यात आली आणि अचानक राज्यपालांच्या विमान प्रवासास परवानगी नाकारली हे अनाकलनीय असल्याचे सांगत राज्यपाल आणि सरकार हा संघर्ष जुनाच मात्र असा प्रकार कधीच घडला नाही. राज्यपालांना प्रवासाची परवानगी नव्हती तर ते विमानापर्यत गेलेच कसे ? असा उपस्थित करून सरकारच्या मनाचा कोतेपणा दिसून आल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्यपालांच्या अभिभाषणात केवळ शब्दांचे खेळ असल्याचा आरोप करत कोरोना काळात तातडीने जंम्बो रूग्णालयांची उभारण्यात आली, कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आदी गोष्टी राज्यपालांच्या अभिभाषणात सांगण्यात आल्या. मात्र त्यातील वास्तव बघितले, तर या जम्बो रूग्णालयासाठी भाड्याने घेण्यात आलेले व्हेंटिलेटर, बेडस्, खुर्च्या, त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री आदींच्या भाड्याच्या किंमती पाह्यल्या तर त्या किंमतीत खरेदीच झाली असती असे सांगत कोविड काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत मेडिकल क्षेत्रातील कामाचा कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीला या जम्बो रूग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

या काळा राज्य सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान सुरुवातीला चालविले, त्यानंतर मी जबाबदार आता सुरु केलीय आणि उर्वरीत जबाबदारी मोदी सरकारची असा सगळा प्रकार राज्य सरकारकडून सुरु असून सरकार सगळी जबाबदारी झटकून लोकांवर टाकत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

देशातील कोविडचे सर्वात जास्त रुग्ण आणि मृत्यू आपल्या राज्यात तरीही सरकार स्वतःची पाठ थोपटणी सरकार करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

कोविड काळात किती कंत्राटदारांना लाभ झाला याची माहिती सरकारने द्यावी, लोकांना किती फायदा झाला याचीही माहिती सरकार देत नाही असा टोलाही त्यांनी लागवला.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी १२ ऑडिओ क्लिपचे सबळ पुरावे असतानाही गेले वीस दिवस काहीच कारवाई का नाही? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित करत राठोडांचा राजीनामा काय फ्रेम करायला राज्य सरकारने ठेवलाय का? मंजूरीसाठी राज्यपालांकडे का? पाठविला नाही अशी प्रश्नांची सरबती करत राठोड प्रकरणी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.

औरंगाबादच्या मेहबूब शेख प्रकरणी सदरची महिला सातत्याने सांगतेय माझ्यावर बलात्कार झालाय म्हणून परंतु पोलिस त्याची दखलच घेत नाहीत. तिथली डिसीपींना विचारले तर ते असे काय लाजत होते की, जणू काय बायकोचे नाव घ्यायला सांगितल्या सारखे बोलत तुम्हाला तर माहित आहे त्यांचे नाव, मी कसे घेवू नाव सारखी उत्तर देत होते. केवळ सत्ताधारी पक्षाचा शेख आहे म्हणून त्याच्यावर कारवाई होत नाही का? असा सवाल उपस्थित करत सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून अशा चुका होण्याची शक्यता असते मात्र तो पक्ष चुकीचा असा त्याचा अर्थ होत नसल्याचे सांगत शेख वर कारवाई का होत नाही असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

बदल्या, अवैध दारू आणि वाळू उपसा प्रकरणी प्रचंड भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

शेतकरी आंदोलनाच्या अनुषंगाने ग्रेटा थनबर्गचे समर्थन करत सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी केलेल्या ट्विट राज्य सरकारने चौकशी केली जात असल्याबद्दल आर्श्चय व्यक्त करत पुण्यात येवून हिंदू समाजावर टीका करणाऱ्या शर्जील उस्मान वर कारवाई करण्याची आहे का हिम्मत असा सवाल त्यांनी राज्य सरकारला करत याची सरकारला शरम वाटायला हवी असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीस यांच्या वक्तव्याबाबत आक्षेप घेत म्हणाले की, भाजपाच्या आयटी सेलने केलेल्या ट्विटची चौकशी करण्यात येत त्यात १२ जण दोषी आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगत तेंडूलकर आणि मंगेशकरांच्या ट्विटबद्दल नाही असा खुलासा केला.

आरे कारशेड ची २०५३ सालपर्यंतच्या डिझाइनसाठी आहे. मात्र या सरकारने निवडलेल्या कांजूरच्या रूट साठी किमान ५०० झाडं तोडावी लागतील त्याचं काय? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित करताच यावर सभागृहात भाजप सदस्यांनी शेम शेमच्या घोषणा दिल्या. त्यामुळे आरेचा पर्याय निवडून मुंबईकरांना लवकर मेट्रोची सुविधा द्या  अशी मागणीही करत याशिवाय लागणारा वेळ ४ वर्ष उशीर होईल याशिवाय हजारो कोटींचे नुकसान होणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

एफडीआयमध्ये अर्थात परदेशी गुंतवणूकीत राज्य ४ थ्या स्थानावर आहे. पूर्वी एक नंबरवर होता. ईओडिबीच्या सुधारणांमध्ये १५ राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा नंबर नसल्याचे सांगत हे खेदजनक असल्याची खंत व्यक्त करत “नये दंतकथा येथे कोणी, कोरडे ते मनी कोण बोल, अनुभव येथे पाहिजे साचार, न चालती हार आम्हापुढे, वारी कोण मनी रसाळ बोलणे, नाही ज्याने मने ओळखिली, निवडी वेगळे दूध आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळाली, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येर गबाळ्याचे काम नाही या संत तुकारामांच्या गाथेतील अभंग म्हणत आपल्या भाषणाचा शेवट केला.

Check Also

कर्जबुडव्या कारखान्यांना पायघड्या, संकटग्रस्त सामान्यांची उपेक्षा! भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबईः प्रतिनिधी सहकारी साखर कारखान्यांनी व अन्य सहकारी संस्थांनी थकविलेली ३८०० कोटींची देणी सरकारी तिजोरीतून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *